राहुरी/अस्तगाव |प्रतिनिधी| Rahuri

राज्य सरकारच्या गृहखात्याचा 100 कोटींच्या वसुलीचा ट्रेलर आपण नुकताच पहिला आहे. लवकरच

महसूल खात्याचा संपूर्ण पिक्चर दिसेल, असा खळबळजनक दावा खा.डॉ.सुजय विखे यांनी केला. काल विखे पिता-पुत्रांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खा.डॉ.विखे म्हणाले, महसूलमंत्री नुकतेच केंद्र सरकारविरोधात श्रीरामपूर येथे झालेल्या आंदोलनात सहभागी झाले. पंजाब-हरियाणाच्या शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन झाले. मात्र आपल्याच जिल्ह्यातील शेतकर्यांकडे पाहण्यास यांना वेळ नाही. गारपीटग्रस्तांना मदत झालेली नाही. जिल्ह्यातील दुधदरापासून अन्य शेतकरी प्रश्न प्रलंबित आहेत. नुकसान भरपाई मिळत नाही.

इथले शेतकरी वार्यावर सोडून दिल्लीतील शेतकर्यांना पाठिंबा देतात, ही अजब गोष्ट आहे. गृहमंत्र्यांचा 100 कोटींचा ट्रेलर नुकताच राज्याने पाहिला. लवकरच महसूल मंत्रालयाचाही संपूर्ण पिक्चर समोर येईल. याच पैशातून टोळ्या पोसून त्यांना आमच्या अंगावर सोडले जाते. पण स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या तालमीत तयार झालेला हा पठ्ठ्या सर्वांना पुरून उरणार आहे, असे ते म्हणाले.

तर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्कर व माफियांना महसूलमंत्र्यांचे अभय असल्याचा आरोप केला. वाळू वाहणारे महसूलमंत्र्यांचे बगलबच्चे आहेत, असे ते गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत म्हणाले.