विखे परिवार उभारणार दीड कोटींचा ऑक्सिजन प्लँट

विखे परिवार उभारणार दीड कोटींचा ऑक्सिजन प्लँट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना काळात निर्माण झालेली ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परीवार सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असून दहा दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, अशी माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

सर्वच रुग्णालया समोर सध्या ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय पातळीवरूनही ऑक्सिजन उपलब्ध होण्याच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेवून विळद घाटात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तातडीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण आधुनिक परदेशी तंत्रज्ञान वापरून हा जिल्ह्य़ातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

सद्यस्थितीत विळद येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये १५० ऑक्सिजन बेड आहेत. नविन ऑक्सिजन प्रकल्प उभारल्यानंतल बेडची संख्या ३०० करणार येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्य़ात अवघ्या दहा दिवसात कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पाचा मोठा दिलासा नागरीकांना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com