विखेंचे 'हवाई' रेमडेसिवीर अडचणीत... खंडपीठाने दिले 'हे' आदेश

औरंगाबाद |प्रतिनिधी| Aurangabad

अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी हवाईमार्गे आणलेल्या रेमडेसिवीर साठ्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल झाली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार असून तोपर्यंत साठा वाटपाबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगीतले.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी अ‍ॅड.सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी खा.डॉ.सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला, असा दावा खा.डॉ.यांनी केला होता. रेमडेसिवीरचा साठा त्यांनी कोठून आणला, हे त्यांनी जाहीर केलेले नाही. या साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला व सरकारी दवाखान्याला देखिल वाटप केले.

दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ. विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातून खरेदी केला असावा. इंजेक्शनचा साठा भेसळमुक्त व शुद्ध आहे, असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही. एवढा मोठा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला, याचा हिशोब देखील कुठे नाही, असे याचिकाकर्त्यांनी नमुद केले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा व अहमदनगर जिह्यातील गरजू रुग्णांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत समन्यायी पद्धतीने वाटप करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आली.

उच्च न्यायालयाचे न्या. आर. व्ही. घुगे व न्या. बी. यु. देबडवार यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला अशा परिस्तिथीत जी कायदेशीर कार्यवाही करता आली असती, ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी 29 एप्रिल 2021 रोजी आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड.अजिंक्य काळे व अ‍ॅड.राजेश मेवारा तर शासनाच्या वतीने अ‍ॅड.डी.आर.काळे काम पाहात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com