करोनाकाळात नेत्यांचे सोशल मार्केटींग चुकीचे

खा. डॉ. सुजय विखे : कोरडगाव येथे सांसद आदर्श ग्राम योजनेची आढावा बैठक
करोनाकाळात नेत्यांचे सोशल मार्केटींग चुकीचे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

केंद्राकडून जिल्ह्यात मोठा निधी (Large funds in the district from the Central) आणून इतिहासामध्ये नोंद होईल असे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाची विकासकामे मार्गी लावली. राज्यात आम्ही 106 असून विरोधात बसलो, परंतु कधी जाहीरात केली नाही (Not advertised). आघाडीचे नेते मी किती साधा, सरळ, समाजसेवक व खरा आहे हे दाखवत उठता-बसता सोशल मीडियावर जाहिरात (Advertising on social media) करत जिल्हाभर फिरत असल्याची टिका (criticism) खा. डॉ. सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe) यांनी केली.

तालुक्यातील कोरडगाव (Koradgav) येथे आयोजित सांसद आदर्श ग्राम योजनेच्या (Adarsh ​​Gram Yojana) आढावा बैठकीत खा. डॉ. विखे बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, अजय रक्ताटे, सरपंच विष्णू देशमुख, सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण काकडे, गटविकास अधिकारी शितल खिंडे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, नायब तहसीलदार पंकज नेवसे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (State Mahavikasaghadi Government) दीड वर्षाच्या काळात काहीच काम केले नाही. मात्र करोना (Covid 19 ) काळात समाजाला मदत करणार्‍या आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याचे काम केले. राज्यात सध्या विचित्र पध्दतीने काम सुरू असून जिल्ह्यातील काही नेते उठता-बसता सोशल मीडियावर (social Media) फोटो टाकत आहेत. विकासाची कामे आम्ही अनेक पिढ्यांपासून करत आहोत. करोनामुळे केंद्र सरकारकडून कमी निधी मिळाल्याने विकासकामांना वेग देता आला नाही.

मात्र यापुढे जिल्ह्यातील सर्व कार्यालयामार्फत कुठल्याही मागणीवर 30 दिवसांमध्ये कारवाई करुन लेखी माहिती सबंधितांना देण्याची व्यवस्था केलेली आहे. कोणी काहीही टिका (criticism) केली तरी विकासकामे आणि जनतेची कामे करणार, असा निर्धार खा. विखे (MP Vikhe) यांनी व्यक्त केला.

जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया झालेल्यांच्या कुटुंबीयांतर्फे खा. डॉ. विखे यांचा सत्कार करण्यात आला. अजय रक्ताटे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com