लोकसंख्येनुसार गावनिहाय लसीचे नियोजन करा

लोकसंख्येनुसार गावनिहाय लसीचे नियोजन करा

खासदार डॉ. विखे यांच्या आरोग्य अधिकार्‍यांना सूचना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लसीकरणाच्यावेळी (Corona vaccination) उडणार्‍या गोंधळात सुसूत्रता येण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात समान लसीकरणाचे नियोजन करा (Plan for equal vaccination in the village). यातून सर्व गावांना न्याय मिळेल. तसेच कोव्हॅक्सिन (Co-Vaccine) केवळ दुसर्‍या डोससाठी वापरून ते लसीकरण (Vaccine) आधी करावे आणि कोविशिल्डची (Covishield) 60 टक्के लस (Vaccine) पहिल्या डोससाठी, तर 40 टक्के लस दुसर्‍या डोससाठी वापरावी, अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे (MP Sujay Vikhe Patil) यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.

खा. डॉ. विखे (MP Sujay Vikhe Patil) यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक (Review meeting in Zilla Parishad hall) घेतली. त्यात पंतप्रधान आवास योजना ( Prime Minister Housing Scheme), तसेच करोना लसीकरणाचा आढावा (Corona Vaccination Review) घेतला. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालयांचे अधीक्षक, प्राथमिक रूग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सांगळे यांनी आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर विखे (MP Sujay Vikhe Patil) यांनी लसीकरणात येणार्‍या अडचणींवर वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली.

ग्रामीणसह शहरी भागात लसीकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांना अडचणी येतात. लसीकरणाबाबत अनेक तक्रारी येत असून, काही ठिकाणी गोंधळ होत आहे. अनेक गावांत अजून लस पोहोचलेली नाही. सध्या प्राथमिक उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांत उपलब्ध लसीप्रमाणे क्रमाने लसीकरण सुरू आहे. परंतु यातून अनेक जण वंचित राहत आहेत. त्यामुळे गावांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आलेली लस विभागून द्या. म्हणजे मोठ्या लोकसंख्येच्या गावात आवश्यक लस पोहोच होईल. तसेच लहान लोकसंख्येचेही गाव त्यात समाविष्ट होईल.

याशिवाय आपल्याकडे 80 टक्के कोविशिल्ड (Covishield), तर 20 टक्के कोव्हॅक्सिन (Co-Vaccine) अशा प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. सध्या 21 हजार नागरिकांचा कोव्हॅक्सिनचा (Co-Vaccine) दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळे हे लसीकरण आधी संपवण्यासाठी सध्या कोव्हॅक्सिनचा (Co-Vaccine) केवळ दुसराच डोस देण्यात यावा. पहिला कोणालाही देऊ नये. कोविशिल्डचे (Covishield) नियोजन करताना उपलब्ध लसीपैकी 60 टक्के लस पहिल्या डोससाठी, तर 40 टक्के लस दुसर्‍या डोससाठी वापरा, ग्रामीण भागात लसीकरणाचे जसे गावनिहाय नियोजन आहे, तसेच नगरपालिका (Municipality) किंवा महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रात एकाच केंद्रावर लस देण्यापेक्षा वॉर्डनिहाय नियोजन केल्यास सर्वांपर्यंत लस पोहोचेल. याशिवाय नगरपालिकेच्या ठिकाणी असणार्‍या ग्रामीण रुग्णालयात केवळ नगरपालिका हद्दीतील लोकांना लस द्यावी, अशा सूचना खा. विखे (MP Sujay Vikhe Patil) यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com