सहा महिन्यात महामार्गचे काम पूर्ण करणार - खा. विखे पाटील

करंजी येथे अपूर्ण कामाची केली पाहणी
सहा महिन्यात महामार्गचे काम पूर्ण करणार - खा. विखे पाटील

करंजी |वार्ताहर| Karanji

यापुढे कुठल्याही तांत्रिक अडचणी खपवून घेतल्या जाणार नाहीत. महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी समन्वय ठेवून सहा महिन्यांत कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करणार, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू आहे. अर्धवट कामामुळे सातत्याने या महामार्गावर लहान-मोठे अपघात देखील होत आहेत .त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी या महामार्गाच्या कामाबाबत व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी खासदार सुजय विखे पाटील यांनी करंजी येथील अर्धवट कामाची पाहणी केली तसेच ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांच्याशी देखील खासदार विखे यांनी संवाद साधून पंधरा दिवसांत तुम्हाला तुमच्या जमिनीचा मोबदला मिळेल, असा विश्वास दिला.

सहा महिन्यात महामार्गचे काम पूर्ण करणार - खा. विखे पाटील
जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

देवराई, तिसगाव, पाथर्डीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी महामार्गाचे काम अर्धवट रखडलेले आहे त्या कामाची माहिती घेत जमिनी अधिग्रहण केल्या मात्र त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, अशा शेतकर्‍यांशी देखील खासदार विखे यांनी संवाद साधत पंधरा दिवसांत तुमच्या खात्यावर पैसे वर्ग होतील व त्यानंतर तुमच्या अधिग्रहण केलेल्या जमिनीतून रस्त्याचे काम सुरू होईल, असा विश्वास देत आत्ताच रुंदीकरण होणार नाही. आहे तोच रस्ता डांबरीकरणाने पूर्ण केला जाणार आहे. पुढच्या टप्प्यात अतिक्रमण काढून रुंदीकरण केले जाईल, असे खासदार विखे म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, युवानेते अजय रक्ताटे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक खेडकर, सरपंच बाळासाहेब आकोलकर, माजी सरपंच सुनील साखरे, पृथ्वीराज आठरे, शिवसेेना नेते राजेंद्र म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, युवानेते विवेक मोरे, भारत मोरे, लाला खोसे, महामार्गाचे कार्यकारी अभियंता पालवे, उपअभियंता दिलीप तारडे, ठेकेदार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com