बदल्यांमध्ये कमविलेल्या पैशातून कोव्हिड सेंटर सुरू करा

खा. विखे यांचा मंत्री थोरातांवर निशाणा
बदल्यांमध्ये कमविलेल्या पैशातून कोव्हिड सेंटर सुरू करा

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

करोनाच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना 15 लाख खर्चून इंजेक्शन आणले. ते भाजपचा खासदार म्हणून नव्हे तर विखे पाटील परिवाराची जबाबदारी म्हणून आणले.

राज्यातील मंत्री करोनाचा फक्त आढावा घेत असून कार्यवाहीत शून्य आहेत. या मंत्र्यांनी बदल्यांमध्ये कमावलेल्या पैशातून एखादे कोव्हिड सेंटर सुरू करावे. शासनाच्या पैशातून सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरवर आपल्या पाट्या लावू नयेत, असा टोला खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. त्यांचा अप्रत्यक्ष इशारा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचे मानले जाते.

श्रीगोंदा तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरला भेटी देण्यासाठी खा.डॉ. विखे यांनी शनिवारी दौरा केला. यावेळी त्यांनी शासकीय कोविड सेंटरला एक लाख तर खाजगी कोविड सेंटरला प्रत्येकी 50 हजारांची मदत दिली. तालुक्यात लोकसहभागातून सुरू केलेल्या कोळगाव, पिंपळगाव पिसा, घारगाव, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव येथील कोविड सेंटरला तर काष्टी येथील ऑक्सिजन प्रकल्पास भेटी दिल्या.

तालुक्यात बाळासाहेब नाहाटा व त्यांच्या सहकार्‍यांनी तर या कामात स्वत:ला वाहून घेतले आहे. या काळात जे जे मदत करतील त्यांना समाज कधीच विसरणार नाही. आणखी वेगाने काम करा. आम्ही आणखी मदत करू असेही यावेळी खा. विखे नाहाटा यांना उद्देशून म्हणाले. यावेळी यावेळी आ. बबनराव पाचपुते, माजी राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा, हेमंत नागवडे, राहूल गोरखे, अविनाश पांढरे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com