खासदार संभाजीराजे उद्या नगरमध्ये

छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या नूतनीकृत स्मारकाचे लोकार्पण
खासदार संभाजीराजे उद्या नगरमध्ये

अहमदनगर (प्रतिनिधी) -

छत्रपती चौथे शिवाजी महाराज जयंतीचे (Chhatrapati 4th Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधत स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने नूतनीकरण केलेल्या छत्रपतींच्या स्मारकाचे लोकार्पण खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या हस्ते ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होत आहे.

१३ वर्षांपासून स्मायलिंग अस्मिताच्या माध्यमातून छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत संरक्षक भिंत आणि वाचनालय हॉलची दुरूस्ती झाली होती आणि आता तेथेच विशिष्ट ठेवणीचे सुशोभीकरण नुकतेच आमदार निधीतून करण्यात आले आहे. लवकरच पुढच्या टप्प्यात समाधीवर मेघडंबरी, स्मारकास रेखीव कमान आणि पुतळा सुशोभीकरण होणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या मान्यवरांना स्वराज्याचे पहिले चलन शिवराई देऊन गौरविण्यात येणार आहे. सोबतच शिल्पकार विकास प्रकाश कांबळे यांचे शिल्प प्रात्यक्षिक होणार आहे, अशी माहिती स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली आहे. कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे शेतकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

प्रा. सदाशिवराव निर्मळे, ऋषिकेश दुसंग, अभिजित दरेकर, शुभम पांडूळे, गजानन भांडवलकर, अजित कोतकर, सचिन सापते, अस्लम शेख, धिरज कुमटकर, भाग्यश्री वांढेकर, अक्षय शेळके, जैद शेख, संभाजी कदम कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com