खाजगी पेक्षा सरकारी रुग्णालयांची सेवा उत्तम - खा. लोखंडे

खाजगी पेक्षा सरकारी रुग्णालयांची सेवा उत्तम - खा. लोखंडे

अकोले |प्रतिनिधी| Akole

खाजगी रुग्णालयापेक्षा सरकारी रुग्णालयात एम.बी.बी.एस. व उच्च शिक्षित डॉक्टर्स कडून मोफत औषधे, उपचार मिळतात, ते उत्तम सेवा देतात. तेव्हा नागरिकांनी सरकारी रुग्णालयाचा व शासनाच्या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी केले आहे.

आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने अकोले ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात 900 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार लोखंडे व आ. डॉ. किरण लहामटे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे होते.

व्यासपीठावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील साळुंके, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, शहराध्यक्ष नितिन नाईकवाडी, आरपीआय नेते विजयराव वाकचौरे, नगरसेवक नवनाथ शेटे, आरीफ शेख, व्यापारी संघटनेचे अनिल कोळपकर, डॉ. राहुल कवडे, डॉ. दिघे, डॉ. घोडके आदी उपस्थित होते.

खासदार लोखंडे म्हणाले, कोविड संकटकाळात सर्वाधिक रुग्ण आपल्या अहमदनगर जिल्ह्यात होते. त्यावेळी आपल्या या सरकारी रुग्णालयातील डॅाक्टर्स, सर्व स्टाफ, सामाजिक संघटना, या सर्वानी चांगले काम केले म्हणून आपण करोनावर मात करू शकलो. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे या योजनेतून खाजगी रुग्णालयातही एका व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंतच्या सुविधा मिळतात. तसेच युनिक हेल्थ कार्ड तातडीने प्रत्येकाने काढावे यामुळे आपल्याला आपली कागदपत्रे घेऊन फिरावे लागणार नाही अनेकदा कागदपत्रे सापडत नाहीत. या युनिक (डिजिटल) हेल्थ कार्ड मध्ये आपली सर्व आरोग्याची माहिती ऑनलाईन उपलब्ध असते. अशा या कार्डची सुविधा श्रीमंतांना यापूर्वी उपलब्ध होती. आता सरकारने गोरगरिबांच्या आरोग्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, कोविड संकटकाळात तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने खुप चांगले काम केले आहे. करोना वाईट होता परंतु खुप काही शिकवून गेला या संकटकाळाने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुधारली.

याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी आरोग्यविषयक शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रास्तविक डॉ. राजीव घोडके यांनी अध्यक्षीय सूचना डॉ. डी. के. धांडे यांनी मांडली त्यास अनुमोदन डॉ. अजय शिंदे यांनी दिले. सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग तर आभार डॉ. पुनम कोटकर (कानवडे) यांनी मानले.

याप्रसंगी एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय धामणवनचे डॉ. मुग्धा वाजे, डॉ. प्रणव फावले, डॉ. वैभव कुटे, डॉ. रिया उधाणी, डॉ. केदार कदम, डॉ. प्रणिता शिंदे, डॉ. संदिप बोरले, दीपक जाधव डॉ. देविदास नवले, डॉ. संदेश भांगरे, डॉ. भांगरे बाळुरामजी, डॉ. जगताप, डॉ. मंजुश्री चांदोरे, डॉ. नूतन येणारे, डॉ. नमिता सहाणे, ब्रदर आकाश देसाई, प्रणिता शिंदे, प्राजक्ता घुले, विक्रम नाईकवाडी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.