जमावबंदीचा भंग अखेर सत्ताधारी खासदाराच्या अंगलट

समर्थकांसह 11 जणांवर गुन्हा : निळवंडे लाभक्षेत्रात खळबळ
जमावबंदीचा भंग अखेर सत्ताधारी खासदाराच्या अंगलट

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

उत्तर नगर जिल्हयातील जिरायती टापुला वरदान ठरणार्‍या निळवंडेच्या कालव्यांचे पिंप्री निर्मळ शिवारात खा.सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले,

मात्र करोना संकट काळामुळे राज्यात संचारबंदी व साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे.या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले. या घटनेने जिरायत टापूत खळबळ उडाली आहे.

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुख्य कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे.पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो.या कालव्याची निविदा प्रसिध्द होऊन वर्कऑर्डर झाली आहे.खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

खा.लोंखडे सह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सदस्यही यावेळी हजर होते. मात्र राज्यात करोना संकट काळ सुरु असल्याने सरकारने राज्यात कडक लॉकडाऊन व संचारबंदी सुरू केलेली आहे. या काळात फक्त अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडायचे निर्देश लागु असतांना पिंपरी निर्मळ शिवारात 400 केव्ही.महावितरण केद्रांजवळ कोणत्याही जबाबदार अधिकार्‍यांची परवानगी न घेता खा.सदाशिव लोखडे,नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे, सौरभ शेळके,शिवाजी शेळके, विलास गुळवे, प्रभाकर गायकवाड आदींनी उद्घाटनासाठी एकत्र येऊन जिल्हाधिकार्‍यानी लागु केलेल्या जमावबंदीचे उल्लघनं तसेच साथरोग कायदयाचे उल्लघंन केल्या प्रकरणी लोणी पोलिसात स.फौजदार सुदाम फंटागरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रं.नं 140/21 भादंवि कलम 188,269,271 साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे 2,3,4 प्रमाणे,महा पोलीस अधानियम 37(1) (3)चे उल्लंघन केल्याप्रकरणी 135 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. निळवड़े कालव्यांचे काम अंतिम टप्यात आहे. या अंत्य कालव्याचे काम झाल्यास पुढील वर्षी पाण्याची चाचणी होण्याची शक्यता आहे. झालेल्या या घटनेमुळे जिरायत टापुत खळबळ उडाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com