शिर्डीतील नुकसानीचे पंचनामे करा - खा. लोखंडे

शिर्डीतील नुकसानीचे पंचनामे करा - खा. लोखंडे

शिर्डी |शहर प्रतिनिधी|Shirdi

शिर्डी शहरातील जुन्या लेंडीनाल्याला अचानकपणे पाणी वाढल्याने शहरातील हेडगेवार नगर, श्रीरामनगर तसेच पुनमनगर मधील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे.

दरम्यान नुकसानग्रस्त रहिवाशांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी व परिसरातील पुर परिस्थितीची काल गुरुवारी दुपारी पाहणी केली हॉटेल मालक व बिल्डर यांनी जे अतिक्रमण केले आहे त्या सर्वांची मोजणी करून निमगाव व शिर्डी हद्दीतील सर्व नाला मोकळा करावा सदर प्रकरणी त्वरित कारवाई करायला हवी, असे सांगत लेंडी नाल्याचे पावित्र्य जपावे व कायमस्वरूपी उपयोजना करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिर्डी नगरपंचायतचे बी. व्ही. जी. कंपनीचे स्वछता कामगारांचे पगार त्वरित करावे तसेच श्री साईबाबा संस्थान कंत्राटी कामगारांची पगार कपात रद्द करावी. यासाठी कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मार्ग काढू, असे सांगितले.

याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे, मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे, कामगार तलाठी श्री. झेंडे, शिवसेना नेते कमलाकर कोते, शिवसेना तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे, डॉ.एकनाथ गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, राहुल गोंदकर, जयराम कांदळकर, महेंद्र कोते, महेश महाले, सुनील बारहाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, मनसे जिल्हाध्यक्ष दत्त्ता कोते, शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, शिवसेना शहर प्रमुख सचिन कोते, शहर संघटक अमोल गायके, शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय तळेकर, उपशहरप्रमुख सुयोग सावकारे, विश्वजित बागुल, उपतालुका प्रमुख विठ्ठल पवार, पुंडलिक बावके, अनिल पवार, किरण कांदळकर, सुभाष उपाध्ये, सागर जगताप, योगेश कोते, हेमंत गोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com