आगामी निवडणुकांमध्ये ‘स्व’बळाची तयारी ठेवा - खा. किर्तीकर

आगामी निवडणुकांमध्ये ‘स्व’बळाची तयारी ठेवा - खा. किर्तीकर

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

राज्यातील आघाडी असलेल्या पक्षाची युती झाली, तर ठीकच मात्र युती झाली नाही तर कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुका ‘स्व’ बळावर लढण्याची तयारी ठेवावी, त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करा असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. गजानन किर्तीकर यांनी येथे केले.

शिवसंपर्क अभियान टप्पा दोन अंतर्गत शेवगावात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांचा मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख सिद्धार्थ काटे यांनी तयार केलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी डिजिटल अ‍ॅपचा शुभारंभ खा. किर्तीकर यांचा हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी, जिल्हा संपर्क संघटक अश्विनीताई मते, जिल्हाप्रमुख नगर दक्षिण राजेंद्र दळवी, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, महिला आघाडी जिल्हा संघटक मंगल म्हस्के, एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे, तालुका प्रमुख अविनाश मगरे, युवा सेनेचे शितल पुरनाळे, शहर प्रमुख सिद्धार्थ काटे, महेश पुरनाळे, रामदास गोल्हार, पाथर्डी तालुकाप्रमुख अंकुश चितळे, विष्णुपंतपवार, रामजी साळवे, शिवाजीराव काटे यांचासह दोन्ही शहरप्रमुख,उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, प्रमुख महीला आघाडी, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. भारत लोहकरे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com