सेनेशी लढत देण्याएवढा भाजप ताकदवान नाही

खा. किर्तीकर : नगरमध्ये शिवसंपर्क अभियाननिमित्त बैठक
सेनेशी लढत देण्याएवढा भाजप ताकदवान नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे. याठिकाणी पैशाच्या जोरावर राजकारण करून निवडणुका लढल्या जातात. जिल्ह्याला ही सवयच लागलेली असून जिल्ह्याला. अशा परिस्थितीतही शिवसैनिक लढा देत असून याचा शिवसेना पक्ष प्रमुखांना अभिमान आहे. शिवसेनेच्याद़ृष्टीने भाजप हा लढत देण्याइतका ताकदवान पक्ष नाही. भाजपमध्ये पैशाच्या माजावर लढणारी ही माणसे आहेत. पैसा फेकून पळवापळवी करणारा भाजप हा पक्ष असून शिवसेनेने कार्यकर्ता घडवायचा आणि तो नावारूपाला आला की त्याला पैशाचे आमिष दाखवून पळवायचा हे नगर जिल्ह्यात जास्त प्रमाणात चालते या शब्दांत सेना खा. गजानन किर्तीकर भाजपचा समाचार घेतला.

शिवसंपर्क अभियान टप्पा-2 अंतर्गत गुरूवारी जिल्ह्यातील सेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची चार दिवसाच्या नियोजनाची बैठक आयोजित केली होती. यावेळी खा. किर्तीकर बोलत होते. बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शाशीकांत गाडे, राजेंद्र दळवी, शिवसेनेचे उपनेते संजय घाटी, माहिला संपर्क प्रमुख आश्विनी मते, सहकार सेनेचे उपाध्यक्ष प्राविण खोपटे, महापौर रोहिणी शेडगे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, विकृम राठोड, आशाताई निंबाळकर, संदेश कार्ल, शरद झोडगे, राजेंद्र भगत, संदिप गुंड, डॉ. दिलीप पवार, रामदास भोर, प्रविण कोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी खा. किर्तीकर म्हणाले, सेनेचे पद घे आणि चाकरी माझी कर ही वृत्ती साखर सम्राटाची आहे. नगर उत्तरेत काय, दक्षिणेत काय ही हिच अवस्था आहे. मात्र या सर्वांचा समाना करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे.

शिवसंपर्क अभियान अभियानात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, पालकमंत्री योग्य न्याय देतो की नाही, आपल्या हक्काच्या कमिटी आणि पद मिळतात की नाही हे पहायचे आहे. सुदैवाने किंवा दुर्देवाने म्हणा तिन पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्ष स्वत:चे संघटन वाढवण्याच्या दुष्टीने प्रयत्न करतात. शिवसेनेची नगर जिल्ह्यात पक्ष संघटना बांधणी अशी झाली पाहिजे येणार्‍या काळात नगर जिल्हा निर्भय झाला पाहिजे. स्वतःच्या ताकतीवर जिल्ह्यात निवडणुका लढवू. विधानसभेत आपल्या वाट्याला नगर व पारनेर हे दोन मतदार संघ आहे. पारनेर मतदार संघात सेनेच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीने पराभव केला. नगरमध्ये आपल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या आमदार मदत केली. मात्र येणार्‍या काळात सेनेचाच विजय होणार आहे. सेनेच्या पदाधिकार्‍यांना जाणीवपूर्वक प्रशासनाचे अधिकारी त्रास देत असतील तर लेखी निवेदन घ्या. जिल्हाध्यक्ष गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदेश कार्ले यांनी केले.

जिल्हा परिषद गण-गटाची सविस्तर मांडणी झाली का नाही. गट प्रमुखांची योग्य निवड झाली का याची खात्री करा. युवा सेना, माहिला आघाडी, तसेच इतर सेनेच्या संघटना बळ देण्याची गरज आहे, असे खा. किर्तीकर यावेळी म्हणाले. चार दिवस पक्षाचे निरीक्षक ठरवून दिलेल्या तालुक्यात आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे खा. किर्तीकर यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com