खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट
सार्वमत

खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

देशमुखांचा फेटा अन् विखेची जय श्रीरामाची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

Nilesh Jadhav

आश्वी | वार्ताहर | Ashawi

प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) Indorikar Maharaj यांच्या निवासस्थानी खा.डॉ.सुजय विखे पाटील MP Sujay Vikhe Patil यांनी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांसमवेत संवाद साधला. देशमुखांचा फेटा अन् विखेची जय श्रीरामाची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

सम विषम तारखेच्या वक्तव्यानंतर निवृती महाराज देशमुख यांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर निवृती महाराज देशमुख यांच्या निवासस्थानी अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देवून त्यांना पाठबळ दिले. मध्यंतरी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील MLA Radhakrishn Vikhe Patil यांनीही देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. देशमुखांच्या बाबतीत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

खा. सुजय विखे पाटील यांनी अचानक देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीची कोणालाही माहीती नव्हती. खा. विखे यांनी देशमुख यांच्यासह त्यांच्या परिवाराशी संवाद साधत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. खा. विखे यांचा निवृती महाराजांनी फेटा बांधून केलेला सत्कार केला. खा. विखेंनी मात्र 'जय श्रीरामा' ची शाल देवून महाराजांचा केलेला सत्कार लक्षवेधी ठरला आहे.

विशेष म्हणजे या भेटीची पुसटशीही चर्चा नव्हती. यापूर्वी आ. विखे पाटील यांनी भेट घेतल्यानंतर पुन्हा खा. डॉ. विखे यांनी महाराजांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीबाबत खा. डॉ. सुजय विखे यांच्याशी संपर्क साधला असता माझी फक्त सदीच्छा भेट होती. झालेल्या चर्चेबाबत त्यांनी अधिक भाष्य केले नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com