Video : भाजपचे आमदार असणार्‍या ठिकाणी सर्रास लॉकडाऊन

खा.डॉ. विखे : लसीकरण आणि लोकसंख्याच्या निकषानूसार गाव बंदचा निर्णय व्हावा
Video : भाजपचे आमदार असणार्‍या ठिकाणी सर्रास लॉकडाऊन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविडला (Covid 19 ) रोखण्यासाठी जिल्ह्यात 61 गावे बंद (Ahmednagar District Villages Close) करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर खा. डॉ. सुजय विखे आक्रमक (MP Dr. Sujay Vikhe is Aggressive) झाले आहेत. त्यांनी थेट ज्या ठिकाणी भाजपचे आमदार (BJP MLA) आहेत. त्या ठिकाणी सर्रास लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात येत आहे. सत्ताधारी मंत्र्यांच्या तालुक्यात मोठ्या संख्याने करोनाचे रुग्ण सापडत असतांना त्या ठिकाणी सर्व सुरू असल्याचा आरोप (Allegations) केला आहे. यासाठी उदाहरण म्हणून त्यांनी थेट संगमनेर (Sangamner) तालुक्याचा उल्लेख केला असून यामुळे जिल्हाधिकारी (Collector) यांच्या गाव बंदच्या निर्णय हा दबावातून असल्याचा संशय ही व्यक्त केला आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांच्या भेटीनंतर खा. डॉ. विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) बोलत होते. ते म्हणाले, करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट काढण्याची पद्धत चुकीची आहे. एक हजार लोकांना आणि 40 हजार लोकांसाठी एकच नियम लावला जातो. ज्या गावात 80 टक्के लसीकरण झाले आहे, अशा गावांना सूट दिली पाहिजे. गावात झालेले लसीकरण (Vaccination) आणि लोकसंख्येच्या प्रमाणात नव्याने येणारे बाधित याच्या नूसार गाव बंद करण्याचा निर्णय घ्यावा. सध्याचे गाव बंद (Villages Close) करण्याचा निर्णय प्रशासनाने ऑफिसमध्ये बसून घेतलेला दिसत आहे. त्यांना ग्राऊंडवरची वस्तूस्थिती दिसत नाही.

आजही कोविड रुग्णांवर घरीच उपचार सुरू (Covid Patients Start Treatment at Home) आहेत. तालुका पातळवरील सरकारी कोविड सेंटर बंद (Government Covid Center Closed) आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने थेट गाव बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा आहे. यासह राज्यात नगर जिल्ह्यातून करोनाची तिसरी लाट येणार असे अधिकार्‍यांनी जाहीर करत नगरला राज्यात बदनाम करू नका. आपल्या जिल्ह्यातील चाचण्या आणि अन्य जिल्ह्यातील चाचण्या यांची तुलना करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच बंद केलेली गावे पुन्हा निर्बंधमुक्त करावीत. बंद करण्याचा निर्णय दोन दिवसात मागे घेतला जाईल, असे अपेक्षित आहे. अन्यथा वेगळा विचार करण्याचा इशाराही (Hint) त्यांनी यावेळी दिला.

Related Stories

No stories found.