राहुरी, पाथर्डी व नगरचे पुढील आमदार कर्डिलेच असतील - खा. सुजय विखे

राहुरी, पाथर्डी व नगरचे पुढील आमदार कर्डिलेच असतील - खा. सुजय विखे

उंबरे |वार्ताहर| Umbare

2024 साली राहुरी-पाथर्डी व नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिलेच असतील असे सुुतोवाच ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखेपाटील यांनी केले.

राहुरी येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विखे पिता-पुत्रांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर कडाडून टीका करीत राहुरी तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुका कमळाच्या चिन्हावर लढविल्या जातील असे स्पष्ट केले.

विखुरलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने भारतीय जनता पक्ष वाढीसाठी कामाला लागावे. राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायती व विकास सेवा संस्थेत गाव पातळीवर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीच्या राजकारणानुसार युत्या केल्या आहेत. यापुढे कोणत्याही निवडणुकीमध्ये युत्या न करता आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एकसंघ होऊन सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचे काम यापुढे करावे लागेल.

आजही माजी आ. शिवाजीराव कर्डिले हे आमदार नसले तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यामुळे ते आजही सर्वसामान्यांच्या नजरेत ‘आमदार’ म्हणून आहेत. 2024 च्या निवडणुकीत ते आमदारच असतील, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com