...अन्यथा पुन्हा मते मागायला येणार नाही - खा. डॉ. विखे

बोधेगाव येथे बोन्नमा दर्गास चादर अर्पण
...अन्यथा पुन्हा मते मागायला येणार नाही - खा. डॉ. विखे

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सरकारने भाजपाचे लोकप्रतिनिधी असल्याने सूडबुद्धीने त्यांच्या कार्यकाळात विकासासाठी भरीव निधी दिला नाही. मात्र आलेले सरकार हे शेतकर्‍यांचे, सर्वसामन्यांच्या हिताचे असल्याने शेवगाव तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख रस्त्याची कामे प्राधान्याने हाती घेऊन दोन वर्षात पूर्ण करू अन्यथा पुन्हा मते मागायला येणार नाही असा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे केला.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक श्री साध्वी बन्नोमाँ दर्गा यात्रा उत्सवासखा.सुजय विखे यांनी भेट देऊन वाजत गाजत कार्यकर्त्यांसह चादर अर्पण केली. त्यानंतर देवस्थानच्यावतीने खा.सुजय विखे यांचा अध्यक्ष कुंडलिक घोरतळे यांनी सत्कार केला

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, माजी जि.प. सदस्य नितीनराव काकडे, सरपंच सुभाष पवळे, सदा गायकवाड, मयूर हुंडेकरी, महादेव घोरतळे, माजी सरपंच अभय चव्हाण, प्रभाकर हुंडेकरी, प्रकाश गर्जे, नारायण काशिद, चंद्रकांत गरड, बाबा सावळकर, शहादेव गुंजाळ, सागर ढवळे, बबन कुरेशी, सुभाष अकोलकर, दत्ता तहकीक, पांडुरंग तहकीक, अर्जुन ढाकणे, संजय खेडकर, सिकंदर सय्यद, कृष्णा काशीद, प्रांताधिकारी देवदत्त केकान, शेवगाव तहसीलदार छगन वाघ यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,

यावेळी खा.विखे म्हणाले, श्री साध्वी बन्नोमाँ देवस्थानचा तीर्थक्षेत्र ब वर्गात समावेश होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू. तसेच भ्रष्टाचारमुक्त महसूल विभाग करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिव रस्ते, ओढे-नाले वर अतिक्रमण झाले आहे त्याची तीन महिन्यांत शासन व खाजगी यंत्रणेसमार्फत मोजणी करून हद्द निश्चित करून खुले करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय हाती घेतला जाणार असल्याचे खा.सुजय विखे यांनी आवर्जून सांगितले.

नेत्यांना सत्तेशिवाय करमत नाही

राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेशिवाय करमत नाही. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर भरवसा ठेवला आणि त्यांनी शिवसेनेची वाट लावली आहे. खा शरद पवार यांचे नाव न घेता खा. विखे यांनी खोचक टीका केली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com