...तर मग आकारी पडीत जमिनीचा प्रश्न पंतप्रधानांकडे घेऊन जायचा का? - खा. डॉ. विखे

...तर मग आकारी पडीत जमिनीचा प्रश्न पंतप्रधानांकडे घेऊन जायचा का? - खा. डॉ. विखे

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

तुमच्याच तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्या खात्यातील मंत्र्यांना उद्घाटने कार्यक्रमास आणतात. त्यांच्याकडून शेती महामंडळाच्या (Agriculture Corporation) आकारी पडीत जमिनीचा प्रश्न सुटत नसेल तर हा प्रश्न काय पंतप्रधानांकडे घेऊन जायचा का? असा सवाल खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP. Dr. Sujay Vikhe Patil) यांनी महसूल मंत्री बाळासहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat), आ. लहु कानडे (MLA Lahu Kanade) यांचे नाव घेता केला.

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील मुठेवाडगांव (Muthevadgav) येथे द कुटे ग्रुप संचलित साईकृपा दुध संकलन, शितकरण केंद्राचा शुभारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP. Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी सभापती दिपक पटारे अध्यक्षस्थानी होते.

खा. डॉ. विखे म्हणाले की, या स्वार्थाच्या संभ्रमाच्या राजकारणात स्व. बाळासाहेब विखे पाटील (Late. Balasaheb Vikhe Patil) यांनी पक्ष, सत्ताविरहीत आमच्यावर प्रेम करणारी एकनिष्ठ कुटुंबे तयार करून ठेवली. त्यांच्या पाठबळावर आम्ही वाटचाल करीत आहोत. अशा कुटुंबियापैकी वसंतराव मुठे, डॉ. शंकरराव मुठे यांचे एकनिष्ठ कुटुंबिय तिसर्‍या पिढीतही आमच्याबरोबर आहे. त्यांच्या या दुध शितकरण केंद्राबरोबरच द कुटे ग्रुप समुहाचीही भरभराट हाईल. श्रीरामपूर तालुक्याची (Shrirampur Taluka) राजकीय अवस्था अति राजकारणामुळे वाईट झाली.

तालुक्यात, शहरात एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर एकाने डोकं घातलं की मागाहून डोकं घालणारे खुप झालेत. आता परिस्थितीनुसार पुढार्‍यांनीही बदलनं गरजेचे आहे. या तालुक्यात आमच्या विरोधात बोलणारे, गाव, तालुका पातळीपर्यत पदाचा लाभ घेणार्‍यामध्ये केव्हा तरी विखे पाटलांची मदत घेतली नाही, असा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता नाही. अकोले ते पैठण हा चौपदरी महामार्ग झाल्याशिवाय श्रीरामपूरच्या विकासास चालना मिळणार नाही. श्रीरामपूर हे जिल्हा मुख्यालय होणार हे ऐकून ऐकून तरूणाईतले कार्यकर्ते वृध्द झाल्याचे खा. विखे (MP Sujay Vikhe Patil) म्हणाले.

यावेळी दिपक पटारे, भाऊसाहेब बांद्रे, द कुटे ग्रुपचे रवी शेवाळे, बबनराव मुठे, संत निरंकारी मंडळाचे राजकुमार माटा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. शंकरराव मुठे यांनी केले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती नितीन भागडे, द कुटे ग्रुपचे व्हाइस प्रेसिडेंट कैलास शेवाळे, प्रतापराव तांबे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भाऊसाहेब मुळे, बाबासाहेब चिडे, सारंगधर आसने, संदीप शेलार, शंतनु फोपसे, रावसाहेब कासार, भाऊसाहेब पवार, प्रशांत तांबे, सुभाषराव मुठे, शिवाजीराव मुठे, जयराम मुठे, गणेश गोसावी, रविन्द्र मुठे, पोलीस पाटील दत्तात्रय मुठे, संजय आदिक, मधुकर बनसोडे यांच्यासह दुध उत्पादक, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीरामपूर आरटीओ कार्यालय संगमनेरला हलविण्याचा घाट घातला जातोय. एका पाठोपाठ एक कार्यालय नेऊन श्रीरामपुरला जिल्ह्याचे स्पर्धेतून मागे टाकण्याचा डाव असून श्रीरामपूरचे लोकप्रतिनिधी यावर गप्प असल्याचे दिपक पटारे म्हणाले. हा धागा पकडत खा. डॉ. विखे म्हणाले, नेत्यांमधील फरक आपण समजा. काही नेते, मंत्री तालुक्यात घेऊन जाण्यासाठी येतात. परंतू आम्ही घेऊन नाही तर देऊन जाण्यासाठी येतो. आरटीओ कार्यालय हलविण्यासाठी हालचाली असेल तर निश्चित थांबवू. आपणाबरोबर रस्त्यांवर येऊन लढ्यात सहभागी होवू, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com