व्यापार्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करू - खा. डॉ. विखे पाटील

व्यापार्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करू - खा. डॉ. विखे पाटील

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील व्यापार्‍यांनी त्यांना येणार्‍या अडचणी आपल्याला सांगाव्यात, त्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

येथील भाजपचे माजी नगरसेवक जिंतेद्र छाजेड यांच्या कार्यलयात खा. विखे यांनी शहरातील व्यापार्‍यांशी संवाद साधला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, गिरधर आसने, सरपंच बाबासाहेब चिडे, विजय शिंदे, डॉ. मनोज छाजेड आदी उपस्थित होते.

यावेळी शहरातील व्यापार्‍यांना यापुढे ज्या अडचणी येतील त्यांनी थेट आपणाशी संपर्क साधावा, असे अवाहान करून खा. डॉ. विखे म्हणाले, आम्ही श्रीरामपुरात लक्ष घातले की, अनेकाच्या पोटात दुखते. पंरतू येथून पुढील काळात आपण शहरात लक्ष घालणार आहोत. अहमदनगरमध्ये उड्डाणपूल झाला. अनेक अडचणी आल्या, त्यावर मात करत आता पूल उभा राहिला आहे. या पुलाच्या खालील बाजुस पोलवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र रेखाटणार आहोत. तर पुलावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

यावेळी संगमनेर रस्त्यावरील रिमांड होम जवळील अंडरग्राउंड रेल्वे पुलाच्या काम करण्यात यावे, त्यास मंजुरी मिळाली असल्याचे व्यापार्‍यांनी संगितले असता, पुढील अठवड्यात सोलापूर येथे सर्व रेल्वे अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. यात हा विषय मांडून मार्गी लावण्यात येईल, असे खा. विखे म्हणाले.

यावेळी नितीन सानप, सतीश कुंकूलोळ, अभिजित नवलाखा, संदीप भोसले, गणेश तिडके, सागर कुर्‍हाडे, महावीर काला, राजेश कासलिवाल, दर्शन बालानी, दिलीप बाठिया, मुकेश कोठारी, बाळासाहेब खाबिया, सुरज सोमाणी, प्रशांत देशमुख, विशाल आरोटे, मनोज नवले, निलेश बोरावके, विराज आंबेकर, संतोष उदावंत, राहुल सराफ, विजय कटारिया, अमोल देवधर, श्याम ठक्कर, स्विकीं नागपाल, किशोर गदीया, गौतम उपाध्ये, संतोष कुंदळे, राजेद्र ससे, विनोद चोरडिया, नविन गदिया, सचिन कोठारी, कांतिलाल बोकडिया, संतोष संघवी, आयाज तोंबोळी, इसाक पटेल, अमोल रोटे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.