महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी 
नवरा तर शिवसेना मुकी बायको
महाविकास आघाडी

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी नवरा तर शिवसेना मुकी बायको

कॉँग्रेस फुकटचे जेवण सोडायला तयार नाही; खा. डॉ. विखे पाटील यांचा निशाणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) संसार म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे (Shivsena) लग्न झाले असून यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नवरा, तर शिवसेना मुकी बायको आहे. दुसरीकडे लग्नाचे निमंत्रण नसतांनाही तिरस्कार सुरू असतांनाही वर्‍हाडी म्हणून काँग्रेस (Congress) सोबत गेली असून लग्नातील जेवणासाठी मागे हटायला तयार नाहीत. काँग्रेसच्या मंडळींना हाणाले तरी खाली बसून जेवणाचे ताट सोडायला तयार नाहीत, अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (BJP MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारचं वर्णन केले आहे.

खा. डॉ. विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) रविवारी विळदघाटात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कारभारावर त्यांनी सडकून टीका (criticism) केली. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे सांगत महाविकास आघाडीला नवरा-बायको आणि वर्‍हाडींची उपमा त्यांनी दिली. खा. डॉ. विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) म्हणाले, पूर्वी तत्त्वावर सरकारची स्थापना व्हायची. आता मात्र स्वार्थावर सरकार स्थापन होत आहे. जनतेचा कौल नसतांनाही सत्तेत बसणण्याची काहींना हौस आहे. विशेष करून राष्ट्रवादीची (NCP) सत्ता आली नसती तर त्यांचे सर्व लोक सेना-भाजपात (Shivsena-BJP) दिसले असते. ही भिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. यामुळे आपण आणि आपली मालमत्ता संपू नयेत, यादृष्टीने राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आलेली आहे.

महाविकास आघाडीचा संसार म्हणजे राष्ट्रवादी नवरा त्याने काहीही मनमानी केली चालते. तर शिवसेना मुकी बायकोच्या भूमिकेत असून नवरा सवत आणेल या भितीने शिवसेना सर्व काही सहन करत आहे. तर काँग्रेसला (Congress) लग्नला बोलवले नसतांना ते वर्‍हाडी म्हणून सोबत आहेत. त्यांचा तिरस्कार सुरू असतांना ते काही लग्नातील फुकटचे जेवन सोडायला तयार नाहीत, या शब्दात राज्यातील महाविकास सरकारचे वर्णन खा. डॉ. विखे यांनी केले.

अधिवेशनाच्या काळात विरोधपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक करताना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, एक सक्षम आणि अभ्यासू विरोधीपक्ष म्हणून फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा राहिला. मागील सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेसने त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. उलट जिल्ह्यातील काही नेत्यांनी विरोधच जास्त केला. त्यामुळेच तर काँग्रेस सोडण्याची वेळ आमच्यावर आली.

महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. त्यांना गरीबांचं हित कशात आहे, हे कळत नाही. त्याचे देणेघेणेही नाही. ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णयही असाच आहे. या निर्णयावर काय बोलावं, हेच कळत नाही. येणार्‍या निवडणुकीत जनताच त्यांना याचे उत्तर देईल. नवीन कामे करण्यापेक्षा केंद्र सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे. केंद्र सरकारच्या योजना राबविताना अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो वापरल्याचं दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतूक करण्याचे किमान त्याचे श्रेय त्यांना देण्याचे औदार्यही या लोकांना दाखविता येत नाही, असेही खा. डॉ विखे पाटील म्हणाले.

पक्षविरहीत आघाडीचा विचार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी खा. डॉ. म्हणाले, या निवडणुकांमध्ये आम्ही नगर जिल्ह्यात वेगळा प्रयोग करणार आहोत. अर्थात त्यासाठी पक्षाची आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची परवानगी घेतली जाणार आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर न लढता जिल्हा विकास आघाडी मार्फत लढविण्याचं आमचं नियोजन आहे. महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकत्र आलेले नाहीत. यामुळे पक्ष विरहित आघाडी करण्याचा प्रयत्न राहणार असून अनेक पक्षांत समविचार लोक आहेत. तर काही चांगल्या विचारांचे तटस्थ लोक आहेत. त्यांना कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली येता येणं शक्य नाही,अशा लोकांना एकत्र आणण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे, यासाठी विरोधीपक्ष नेते फडणवीस यांच्याकडून नगर जिल्ह्यासाठी वेगळी परवागी घेण्यात येणार असल्याचे खा. डॉ. विखे म्हणाले.

Related Stories

No stories found.