खोटी आश्वासने फसवणुकीचे धंदे यापुढे बंद होतील - खा. डॉ. विखे

खोटी आश्वासने फसवणुकीचे धंदे यापुढे बंद होतील - खा. डॉ. विखे

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील बेकायदा वाळू वाहतूक बंद केली जाणार आहे. दिशाभूल करून खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविणारांचे धंदे यापुढे बंद होतील, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. तालुक्यातील खासगी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. खा. विखे म्हणाले, दोन ते अडीच वर्षामध्ये तालुक्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादीने केलेल्या गैरकारभाराच्या फाईल लवकरच जनतेसमोर आणणार आहे.

जनतेला यातूनच खरे कोण आणि खोटे कोण समजेल. तालुक्याला जलसिंचन योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच, त्यामुळे इतरांनी याचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नये, असा टोला त्यांनी लगावला. लवकरच पारनेर तालुक्यात महसूलमंत्री आ. राधाकृष्ण विखे यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम घेऊन जिल्ह्यात व तालुक्यात राष्ट्रवादीने केलेल्या गैरकारभाराचे वाचन करणार आहे. पारनेर तालुक्यात दिवसाढवळ्या व रात्री-अपरात्री डंपरमधून होणारी अवैध वाळू वाहतूक बंद केली जाणार आहे.

महसूल विभागाच्या माध्यमातून होणारी लूटमार बंद केली जाईल. गोरगरिबांना शासकीय कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणावे लागत होते. ते यापुढील काळात थेट घरी मिळणार आहे, असे विखे यांनी सांगितले. यावेळी सुजीत झावरे, बाबासाहेब तांबे, राहुल शिंदे, दिलीप भालसिंग, सुनील थोरात, सागर मैड, विक्रम कळमकर, शंकर नगरे, बंडू रोहकले, बापू भापकर, मारुती रेपाळे, काशीनाथ नवलेसह अनेक गावचे पदाधिकारी भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com