विखे-कर्डिलेंच्या राजकीय फुलझड्या

विखेंनी विचारले, मंत्री होईपर्यंत भाजपात राहणार ना ? || कर्डिलेंचे उत्तर...मी गेलो तर तुम्हालाही घेऊन जाईल
विखे-कर्डिलेंच्या राजकीय फुलझड्या

करंजी |वार्ताहर| Karanji

आपण मला भाजपात (BJP) आणल्याने खासदार (MP) तर झालो, पण घरातील जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि संभाव्य उपमुख्यमंत्रीपद गेले. उद्या मी मंत्री होईपर्यंत तुम्ही भाजपात राहणार की नाही, असा थेट सवाल खा.डॉ.सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विचारल्यानंतर ‘तसा तर तुमचाही भरोसा नाही. मी गेलोच तर तुम्हाला घेऊन जाईल’ या हजरजबाबी माजी आमदार शिवाजी कर्डिलेंच्या (Former MLA Shivaji Kardile) उत्तराने राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे.

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मिरी (Miri) येथील कार्यक्रमात विखे-कर्डिले (Vikhe-Kardile) जोडी आपल्या चिरपरिचित अंदाजात दिसली. एकमेकांना खिंडीत गाठत चिमटे घेण्याची संधी दोघांनीही सोडली नाही. विखेंचा भाजप प्रवेश आणि खासदारकीचे श्रेय पुन्हा एकदा घेत माजी आमदार कर्डिले म्हणाले, मी जेे बोलतो ते करून दाखवतो. मिरी गावातच सुजय विखे भाजपात आले तर खासदार होतील, असा विश्वास मी व्यक्त केला होता. यानंतर तेेे भाजपात (BJP) आले आणि खासदार झाले. लवकरच ते केंद्रात मंत्री देखील होतील.

याचवेळी खा.विखे (MP Sujay Vikhe Patil) यांनी ‘पण तोपर्यंत तुम्ही भाजपात राहणार ना?’ असा चिमटा काढला. त्यावर कर्डिले (Shivaji Kardile) म्हणाले, ‘जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे राहायचं. पण मला तुमचापण भरोसा वाटत नाही. त्यामुळे जाताना तुम्हालाही सोबत घेऊन जाईल.’ त्यांच्या या उत्तराने कार्यक्रमाला जमलेले भाजप नेते आणि पदाधिकार्‍यांच्याही भुवया उंचावल्या. खा.विखेंनी (MP Dr. Sujay Vikhe Patil) आपल्या भाषणातून या विषयावर अधिक भाष्य केले. ते म्हणाले, मी जरी भाजपमध्ये येऊन खासदार झालो. मात्र त्यानंतर आईचे जिल्हा परिषद अध्यक्षपद गेले व वडिलांचे संभाव्य उपमुख्यमंत्रीपदही हुकले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका (Criticism) केली. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात घुसलेल्या कार घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणारे मावळ येथे शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबाराची तुलना कशाशी करणार, असा सवाल खा.विखेंनी केला. तर पंधरा दिवसात अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची मदत जमा न झाल्यास भाजपच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा कर्डिले (Hint Kardile) यांनी दिला. यावेळी भाजपच्या आजी-माजी आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यावाचस्पती...

यावेळी आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) म्हणाल्या, कर्डिले विद्यावाचस्पती असल्याचे मला आता माहित झाल्याने आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची मोठी मदत पक्षाला होईल. मिरी परिसरात मोठे महसुली क्षेत्र असून या परिसरात एक मिनी एमआयडीसी सुरू करण्याची गरज असून त्यादृष्टीने खासदार विखे (MP Dr. Sujay Vikhe) व माजी मंत्री कर्डिले (Former MLA Shivaji Kardile) यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आमदार राजळे (MLA Monika Rajale) म्हणाल्या.

राष्ट्रवादीला टोला

नगर जिल्ह्यातील महामार्गांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari)यांच्नी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र नगरच्या कार्यक्रमात श्रेय लाटण्यासाठी भाजप विरोधी पक्षातील लोकांनी व्यासपीठावरच खुर्च्यांची ओढाताण केली. विकास निधी कोणाचा, श्रेय घेण्यासाठी धडपडतोय कोण, अशा शब्दात खासदार डॉ.विखे यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादीला टोला लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com