
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली, त्याच प्रमाणे माजी आमदार विजय औटी यांनी पारनेर येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना चोर, गुंड म्हणत होते, त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. स्वाभिमानी तालुक्यात अशी लाचारी कधीच दिसली नाही, असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.
खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, औटींच्या निर्णयाने स्वाभिमानी शिवसेनेचे शिवसैनिक बाबाजी तांबे, गणेश शेळके आमच्या बरोबर आले. पारनेर तालुयातील दहशत मोडुन काढण्यासाठी महिलांना व शेतरकर्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत. विधानसभा एकमेकांविरोधात लढले. चोर, गुंड, दरोडेखोर म्हणणारांची युती एका रात्रीत झाली नाही. ती सहा महिन्यांपासून सुरू आहे.
हा संघर्ष गोरगरीब जनतेसाठी उभा केला आहे. त्यामुळे सुज्ञ जनतेने याबाबत निर्णय घ्यावा. तालुयामध्ये जे राजकारण 15 दिवसात पाहायला मिळाले, 50 वर्षे तीन पिढ्या आमचे कुटुंब जिल्हात, तालुयात राजकारणात आहे. लोकांना वेठीस धरून स्वाभिमान गहाण ठेवायचा की सर्व सामान्य जनतेसाठी काम करायचे? स्वाभिमान गहाण ठेवून काम केले असते तर जिल्ह्याचा बिहार झाला असता. मला पण तडजोड, बिनविरोध निवडीसाठी फोन आले. परंतु सर्वसामान्य जनतेसाठी ही तडजोड केली आहे.
नगरपंचायत निवडणुकीत छुपी युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वसामान्य मतदारांनी दोघांना जागा दाखवून एक सर्व सामान्य कुटुंबातील तरूणी निवडून आणली. नगरपंचायतमधील नगरसेवक त्यांच्या स्वतःच्या जीवावर निवडून आले. ही छुपी युती उघड करायची होती, म्हणून त्यांना बरोबर घेतले नाही, असे खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.
एक महिन्यात माज मोडित काढणार
पारनेर तालुयात यांनी तीन वर्षात काय काय खाल्ले याची नोंद माझ्याकडे आहे. दोघांनी मिळून हा तालुका वेठीस धरला. सरकारी यंत्रणेने तीन वर्षात पारनेर तालुयात याच दोघांच्या आशीर्वादाने माज केला. त्या यंत्रणेचा माज पुढच्या एक महिन्यात मोडीत काढलेला दिसेल, असा इशारा खा. सुजय विखे पाटील यांनी दिला.