नूतन ‘आयसीयू’ मध्ये 'एवढे' बेड बालकांसाठी राखीव

खा. डॉ. विखे यांनी सिव्हील हॉस्पिटलची केली पाहणी
नूतन ‘आयसीयू’ मध्ये 'एवढे' बेड बालकांसाठी राखीव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 बेडचे आय.सी.यू सेंटर तयार असून यामधील 40 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नगरचे आय.सी.यू सेंटर तयार झाले आहे. कोविडची लाट येणार नाही.

परंतु ती दुर्दैवाने आली तर आपण सर्वजण सज्ज आहोत. जिल्हा रुग्णालयाचे आय.सी.यू सेंटर जळीत घटना दुर्दैवी व नैसर्गिक होती आपण त्यातून खूप काही शिकलो आणि ती घटना परत होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाची सोमवारी खा.डॉ. विखे पाटील व शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. यावेळी सिव्हिल सर्जन संजय घोगरे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक अजय चितळे आदी उपस्थित होते. केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.

यासाठी जिल्हा रुग्णालय नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने 19 कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेसाठी दिले होते. त्यासाठी खा.डॉ. विखे पाटील, आ. जगताप यांनी पाठपुरावा केला होता. आ. जगताप म्हणाले, येणार्‍या कोविडच्या लाटेमध्ये जीवितहानी होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वसामान्य नागरिकांना सर्व आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com