सत्ताधारी आमदारांच्या कृत्यांकडे प्रशासनाचा जाणीवपूर्वक कानाडोळा

खा. डॉ. विखे यांचा आरोप || रोहित पवारांवर निशाणा
सत्ताधारी आमदारांच्या कृत्यांकडे प्रशासनाचा जाणीवपूर्वक कानाडोळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दसर्‍याच्या (Dussehra) निमित्ताने काही लोकप्रतिनिधींनी गर्दी (Crowd) जमविण्याचा घाट घातला आहे. मात्र त्यांच्यावर नगरचे जिल्हाधिकारी (Nagar Collector) कारवाईचे धाडस दाखविणार नाहीत, असा गंभीर आरोप खा.डॉ.सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी केला आहे. खर्डा येथे आ.रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या पुढाकारातून होणार्‍या स्वराज्य ध्वज कार्यक्रमावर (Swarajya Dhwaj Program) त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोट ठेवले आहे.

नगरमध्ये माध्यमांशी बोलताना खा.डॉ. विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) म्हणाले, जिल्ह्यातील गावांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय हा पूर्णता चुकीचा आहे. अनेक वेळा यावर वादविवाद झाले. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जास्तीतजास्त लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. 80 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या गावात लॉकडाऊनची आवश्यकता नाही. मात्र जिल्हाधिकार्‍यांचा निर्णयापुढे कोणी जाऊ शकत नाही. लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक आहे. लॉकडाऊनची ही प्रक्रिया या पद्धतीने फक्त नगर जिल्ह्यातच (Ahmednagar District) राबविली जात आहे.

खर्डा (Kharda) येथेही आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी स्वराज्य ध्वज कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खा.विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी त्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, दसर्‍याच्या निमित्ताने काही ठराविक लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. अशा कार्यक्रमांबाबत प्रशासनाचा पक्षपातीपणा सरसकट दिसून येतो. जिल्हाधिकार्‍यां निपक्ष काम केले पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीच्या चुकीच्या कृतींकडे कानाडोळा केला जातो. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवत नाहीत. दसर्‍याला काही तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी गर्दी जमवणार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवणार नाहीत हे मी लिहून देतो, असे खा.डॉ.विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com