लॉकडाऊन बोगसपणा, त्याची गरज नाही

खा.डॉ. विखे : लोकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्यासोबत, लसीकरण महत्वाचे
लॉकडाऊन बोगसपणा, त्याची गरज नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन वर्षापासून जनता घरात बसून आहे. आता लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमाला गर्दी होतांना दिसत आहे. दुसरीकडे प्रशासन लॉकडाऊन आणि नाईट कफ्यू लावत असून गर्दीच्या ठिकाणी दंड करत आहेत. मात्र, हे चुकीचे असून लॉकडाऊन आणि कफ्यूची आता गरज नाही, हा सर्व बोगसपणा आहे. त्याऐवजी जनतेने आता करोनाला सोबत घेवून जगणे शिकले पाहिजे. करोनापासून बचाव आणि लसीकरण हाच करोनावर मात करण्याचा पर्याय असल्याचे मत भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊन बोगसपणा, त्याची गरज नाही
नववर्षाचे स्वागत यंदाही घरीच!

नगरच्या विळद घाटात खा. डॉ. विखे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आता कितीही निर्बंध लावले तरी उपयोग होणार नाही. लग्न समांरभ आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करणे काही गुन्हा नाही. दोन वर्षे झाली जनता घरात बसून आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले असून यामुळे करोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावणे म्हणजे जनतेला आणखी बेरोजगारीच्या खाईत लोटण्या सारखे आहे. दुसरीकडे लग्न होत राहतील आणि झालेच पाहिजे. एका लग्न समारंभावर अनेकांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो.

लॉकडाऊन बोगसपणा, त्याची गरज नाही
Good Bye 2021 : करोना, अतिवृष्टी अन् अग्नी तांडव

लग्नांवर निर्बंध आणून या व्यवसायावर अवलंबून असणार्‍यांनी काय कराचे, त्यांच्या कुटूंबाला काय खाऊ घालयचे. दुसरीकडे लग्नला गर्दी होत आहे. लग्न समारंभ आयोजित करणार्‍या व्यक्तीच्या प्रेमापोटी जनता ओमिक्रॉनचे संकट असतांना गर्दी करत आहेत. त्यातून जनतेचे एकमेंकांवरील प्रेम दिसत असून यामुळे गर्दी होतांना दिसत आहे. जनतेने आता करोनाला सोबत घेवून जगणे शिकले पाहिज. गर्दीच्या ठिकाणी करोना नियमांचे पालन करत लसीकण हा करोनाला रोखण्याचा पर्याय असल्याचे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे जर सामान्य लोकांवर गर्दीच्या कारणावरून प्रशासन कारवाई करत असतील मोठ्या लोकांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे. असे असले तरी प्रशासनाने आता लॉकडाऊन आणि करवाई थांबवली पाहिजे हे सर्व बोगसपण असल्याचे खा. विखे यांनी शेवटी स्पष्ट केले.

लॉकडाऊन बोगसपणा, त्याची गरज नाही
श्रीगोंद्यात चार दुचाकी पेटवल्या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com