पूरग्रस्तांना भरीव मदत करू - खा. डॉ. विखे

पाथर्डीत अतीवृष्टी भागाची पाहणी करताना आश्वासन
पूरग्रस्तांना भरीव मदत करू - खा. डॉ. विखे
खा. डॉ. सुजय विखे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

अतिवृष्टीमुळे (Heavy rain) पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील बाधित गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतीसह (Farme) जनावरांची (Animal) प्रचंड मोठी जीवित हानी झाली असून शेती, अवजारे, संसारोपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. संकटात आपण जनतेसोबत असून केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून पूरग्रस्तांसाठी (Flooding) भरीव मदत दिली (help) जाईल असे प्रतिपादन खा.डॉ सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe) यांनी केले.

खा.डॉ.सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe) यांनी तालुक्यातील कोरडगाव, मुखेकरवाडी, कोळसांगवी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून अधिकार्‍यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जि.प.सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, सभापती गोकुळ दौंड, अजय रक्ताटे, नगरसेवक अनिल बोरुडे, बंडू बोरूडे, अ‍ॅड.प्रतिक खेडकर, मंगल कोकाटे, पांडुरंग सोनटक्के, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अतिवृष्टीने शेकडो घरेे पाण्याखाली गेली.असंख्य प्राण्यांना जीव गमवावा लागला.अनेक बंधारे फुटल्याने नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या. ऊस, कापूस, तूर, उडीद, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेतकर्‍यांशी विखे यांनी संवाद साधला. तसेच कोळसांगवी येथील पुराच्या पाण्यात वाहून जात असताना बचावलेल्या वयोवृद्ध भगवान घुले यांची घरी जाऊन भेट घेतली.केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतील त्यातून पूरग्रस्तांसाठी काही भरीव मदत देता येईल का त्यासाठी अधिकर्‍यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com