पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बदलण्याच्या हालचाली !

राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बदलण्याच्या हालचाली !
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर (प्रतिनिधी)

कोल्हापूरमध्ये बसून नगर जिल्ह्याचे पालकतत्व स्वीकारलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पक्षाच्या नेतृत्वापासून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रारी थेट राष्ट्रवाीदचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचल्या असून यामुळे मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धोक्यात आले आहे. यामुळे मुश्रीफ यांच्याकडून नगरचे पालकमंत्रीपद हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे.

राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर नगरपासून कोसो दूर असणार्‍या कोल्हापूरचे मुश्रीफ यांच्या खांद्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर नगरला पहिल्याच बैठकीत मुश्रीफ यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करून नगर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा मानस बोलून दाखविला. मात्र, त्यानंततर पालकमंत्री गायबच झाले. दरम्यान, करोनाचा कहर वाढला. या काळात पालकमंत्री मुश्रीफ यांची जिल्ह्याला नितांत गरज असतांना महिनामहिना ते गायब होते. यामुळे करोना हातळण्याची जबाबदारी अधिकार्‍यांना पार पाडावी लागली.

सलग दुसर्‍यावर्षी जिल्ह्यात करोनामुळे सत्ते असून ही पक्षाच्या आमदारांना काम करण्यास फारशी संधी मिळाली नाही. तर पालकमंत्री मुश्रीफ यांनी देखील जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांसह नेत्यांना फारसे गांर्भियाने घेतले नसल्याची खदखद पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. सत्ता असतांनाही कामे होत नाहीत. तर दुसरीकडे करोनाच्या दुसर्‍या लाटेत चांगल्या चांगल्याचे हाल  झाले. अशा वेळी पालकमंत्री गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत व्यस्त होते, अशी टीका विरोधक करत असले, तरी पक्षातील अनेक ही वस्तूस्थिती असल्याचे मान्यत करत आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील सर्वच परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री मुश्रीफ कमी पडल्याचे दिसत आहे. प्रशासन आणि अधिकार्‍यांवर त्यांचा वचक न नसल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या असणार्‍या आणि राज्याच्या लक्ष लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून पालकमंत्री लांब होते. तर वाढता  करोना करोनाचा धोका हाताळण्यासाठी अखेर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना जिल्ह्यात फिरण्याची वेळ आली.

देशाच्या, राज्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नजेतून ही बाब सुटलेली नाही, तर नवलच म्हणावे लागेल. त्यातच जिल्ह्यातील काही नेत्यांनी याबाबत थेट पवार यांच्याकडे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातील कामगिरीबाबत तक्रारी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे करोना काळ संपल्यानंतर मुश्रीफ यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे नगरच्या पालकमंत्री पदासाठी आपसूक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. वळसे पाटील यांना जिल्ह्याचा आवाका माहिती असून पक्ष वाढीसह स्वकियांना सोबत घेवून विरोधकांचा बिडमोड करण्याची हतोटी त्यांच्याकडे असल्याने करोना प्रार्दुभाव कमी झाल्यावर नगरचे पालकतत्व वळसे पाटील यांच्या खांद्यावर जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांना आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com