मातीच्या ढिगार्‍यांमुळे वाहतुकीस अडथळे

गणेशवाडी-सोनई रस्त्यावर बेकायदा खोदकाम
मातीच्या ढिगार्‍यांमुळे वाहतुकीस अडथळे

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील गणेशवाडी ते सोनई या रस्त्यावर सध्या बेकायदा खोदकाम सुरू असून त्याची माती रस्त्यावर पडल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

या रस्त्यावर सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने ट्रॅक्टर, गाड्या यांना रोज अपघात होत आहेत. जवळपास घरे असल्याने अनेकदा या घरावर, जनावरांच्या गोठ्यावर ऊस ट्रॅक्टर उलटून मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या मधोमध देखील मोठमोठे खड्डे खोदून रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. गेली तिस वर्षांनंतर चांगला रस्ता गावाला मिळाला. यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याने ठिकठिकाणी असे विघ्नसंतोषी लोक रस्त्याचे नुकसान करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शंकर दुबाले यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधला असता फक्त अधिकार्‍यांना पाठवतो एवढेच उत्तर देऊन वेळ मारून नेतात. रस्त्याच्या नुकसानीस जबाबदार ठेकेदारावर रस्त्याच्या नुकसानीस जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठेकेदारावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित अधिकार्‍यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे गणेशवाडी व परिसरातील नागरिकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com