मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी

कुठे घडली घटना ?
मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी

कर्जत |वार्ताहर| Karjat

मातीच्या ढिगार्‍याखाली (Mounds of Soil) दबून एका बालकाचा जागीच मृत्यू (Child Death) झाला तर एकजण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) सुपा फाटा येथे आज गुरुवारी दुपारी घडली. नितीन दीपक यादव (वय 8) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हेमंत दीपक यादव (वय 6) असे गंभीर जखमी (Injured) झालेल्या मुलाचे नाव आहे.

मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
माध्यमिक विभागाच्या छताचे प्लॅस्टर कोसळले

ही भावंडे मातीच्या ढिगार्‍यामध्ये (Mounds of Soil) जागा करून खेळत होती. दरम्यान वरुन मातीचा ढीग कोसळल्याने (Mounds of soil Collapse) दोन्ही मुले मातीखाली दबली गेली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मात्र त्यावेळी बराच उशीर झाल्याने एकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. दोन्ही मुले ही मजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबासोबत राहत होती. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांना कर्जत (Karjat) येथे आणण्यात आले. जखमीवर कर्जतच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.

मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
जिल्ह्यात 4479 हेक्टरवरील पिकांना ‘अवकाळी’ चा तडाखा
मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
कारवाईच्या ससेमिर्‍यामुळे नेवासा दूध संघ होणार बंद
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com