
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून मोटारसायकल चोरी करणार्या अट्टल गुन्हेगारांना काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील दोघा आरोपींना पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असताना दोघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल पकडली. या मोटारसायकलची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना या गाडीचा संशय आला. त्यांनी अक्षय गाडेकर यास तू गाडी कोणाकडून खरेदी केली याची माहिती घेतली. अक्षय गाडेकर याने मोटारसायकल घेणार्याची नावे सांगितली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना या गुन्ह्यातील मोटार सायकल बाबत गोपनिय माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकार्यांना तपासाचे आदेश दिले.
शहर पोलीस पथकाने सापळा रचून ज्ञानेश्वर महादेव देवकर रा. नेवासा, नल्ल्या उर्फ आकाश अनिल गायकवाड रा. नेवासा यांना अटक करुन त्यांचेकडून तपास करत होन्डा शाईन कंपनीचे 3 मोटारसायकल, एक हिरो एच.एफ. डिलक्स, एक होन्डा अॅक्टीवा असे एकूण 5 मोटारसायकल (एकूण किम्मत 3,50,000रुपये). मुद्देमाल जप्त केला आहे. सदर मोटार सायकल पुणे, नाशिक अहमदनगर औरंगाबाद येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी ज्ञानेश्वर महादेव देवकर यांचेवर वैजापूर, सांगवी, पुणे ग्रामिण, सोनईे, नेवासो, हडपसर, बदलापूर आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक, संदिप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांचेसह पोलीस निरीक्षक जिवन बोरसे व पोलीस नाईक पंकज गोसावी, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस नाईक एम. के. शेलार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार यांचे पथकाने केली आहे.