12 मोटारसायकली जप्त, दोघांना अटक

12 मोटारसायकली जप्त, दोघांना अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोलेतुन चोरी गेलेल्या मोटारसायकलच्या गुन्ह्याचा तपास करताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तपास पथकाला चोरीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे. मोटारसायकलचोरीप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

संगमनेर उपविभागातुन मोटार सायकलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना आण्णासाहेब दातीर, (संगमनेर तालुका पोलीस स्टेशन,) पो. कॉ. सुभाष बोडखे, पो कॉ. प्रमोद गाडेकर, (घारगांव पोलीस स्टेशन), पो. कॉ. अमृत आढाव (संगमनेर शहर पोलीस स्टेशन) व पो. कॉ. गणेश शिंदे अकोले पोलीस स्टेशन असे पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.

अकोले पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 06/2022 भा.द.वि.कलम 379 प्रमाणे दि.04/01/2022 रोजी दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीने त्यांची बजाज कंपनीची लाल काळ्या रंगाची डिस्कव्हर एमएच-17-ए के-2884 अशी मोटार सायकल कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याची फिर्याद दिली होती या गुन्ह्याचे तपासात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी प्रविण एकनाथ गांडाळ (वय 21, रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर) याने केला आहे.

त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार शरद रमेश गांडाळ (रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर) याचे मदतीने सदरच्या मोटार सायकल विक्री केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गांडाळ यास ताब्यात घेतले. त्याच्याकड चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांचे इतर दोन साथीदार यांचे सोबत आणखीन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले आहे. त्यांचे इतर दोन साथीदार फरार असुन अटक आरोपी यांचे कडुन सुमारे 5 लाख रुपये किमतीच्या 12 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com