मोटारसायकल व सोन्याचे दागिने चोरणारा अटकेत

मोटारसायकल व सोन्याचे दागिने चोरणारा अटकेत

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील घोडसरवाडी येथून मोटारसायकल व सोन्याचे दागिने अशी एकूण 1 लाख 85 हजारांची चोरी करणार्‍या आरोपीस अकोले पोलिसांनी थेट मोठ्या शिताफीने ठाणे जिल्ह्यातील टिटवळा, ता. कल्याण येथून मुद्देमालासह अटक केली आहे.

यासंदर्भात मनोज सोपान घोडसरे (वय 18 वर्षे, रा. घोडसरवाडी ता अकोले) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली होती. 13/04/2022 रोजी दुपारी 3.30 वा. ते 5.30 वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घरातून घोडसरवाडी समशेरपूर येथून आरोपी श्रावण किसन बरमाडे याने एकुण- 1,85,000 /- रु.कि. रोख रक्कम, सोन्याचे दागदागिने व एक मोटार सायकल असा मुद्देमाल चोरून नेला. त्याबाबत अकोले पोलीस ठाणे येथे दिनांक 13 एप्रिल रोजी गुन्हा रजि नंबर 150/2022, भारतीय दंड संहिता कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासाकरिता एक पोलीस पथक तयार करण्यात आले.

त्यांनी तात्काळ तपास सुरू करून दिनांक 16 एप्रिल रोजी टिटवळा ता. कल्याण, जिल्हा ठाणे येथे जाऊन आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. श्रावण किसन बरमाडे (वय 38 वर्षे, रा. सिद्दी विनायक चाळ, कोलशेत रोड, आझादनगर, जि. ठाणे) असे त्याने त्याचे नाव सांगितले. त्याचे विरोधात अकोले पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. दिनांक 16 एप्रिल रोजी त्यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने दिनांक 19 एप्रिल पर्यंत त्याची पोलीस कोठडी दिली. गुन्ह्याचा तपास केला असून त्याच्याकडून पोलीस कोठडीमध्ये असताना त्याने गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, सोन्याचे दागीने व चोरलेली मोटार सायकल असा एकूण 1,85,000/- रु. कि. मुद्देमाल हस्तगत केला आहे. संबंधित आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक वलवे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधीकारी संगमनेर विभाग राहुल मदने यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशन चे सपोनि मिथुन घुगे, पो. उपनिरीक्षक भूषण हांडोरे, पो.ना. रविंद्र वलवे, पो.ना. फुरकान शेख, पोकॉ अविनाश गोडगे, पो. कॉ, सुयोग भारती, पो.कॉ. आनंद मैड, पो.कॉ. संदीप भोसले यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.