मुलीसह आईचा विहीरीत पडून मृत्यू

मुलीला वाचवितांना घडला प्रकार
मुलीसह आईचा विहीरीत पडून मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

सरपन गोळा करत असताना विहिरीत (Well) पडलेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न (Trying to save the girl) करणार्‍या आईचा देखील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (mother also drowned Death) झाल्याची घटना घडली आहे.

कर्जत (Karjat) तालुक्यातील कानगुडे वाडी या गावांमध्ये सरपन गोळा करण्यासाठी शेतामध्ये गेलेल्या आशा राजु उकिरडे (वय 42) व उमा राजू उकिरडे (वय 16) वर्ष या दोघींचा संदीप कानगुडे यांच्या विहिरीमध्ये बुडून दुर्देवी रित्या मृत्यू झाला आहे. कानगुडे वाडी येथील आशा उकिरडे व उमा उकिरडे या दोघी स्वयंपाक करण्यासाठी वाळलेले सरपण जाळण्यासाठी कानगुडे यांच्या शेतामध्ये गोळा करत असताना त्यांच्या विहिरीजवळ (well) वाळलेल्या लिंबाच्या झाडाची फांदी त्यांना दिसली.

ही फांदी तोडण्याचा प्रयत्न करत असताना उमा उकिरडे हीचा तोल जाऊन विहिरीमध्ये पडली. यावेळी मुलीला वाचवण्यासाठी आई आशा यांनी देखील तिच्या पाठोपाठ पाण्यामध्ये उडी घेतली. विहिरीत पाणीही भरपूर होते आणि दोघींनाही पोहता येत नसल्यामुळे दोघींचाही बुडून मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये (Karjat Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com