लग्नासाठी मुलीला डांबून ठेवल्याची आईची तक्रार

मुलगी म्हणते माझे तरूणावर प्रेम : सहमतीने सोबत आल्याचा दावा
लग्नासाठी मुलीला डांबून ठेवल्याची आईची तक्रार
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी) - लग्नासाठी मुलीला तरूणाने डांबूृन ठेवल्याची तक्रार अकोला येथील एका महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत त्या तरूणीसह तरूणाचा पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांसमोर येताच तरुणीने सांगितले, माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी मर्जीनेच त्याच्यासोबत आले आहे. मुलीचे हे वाक्य ऐकताच फिर्यादी महिलेस धक्काच बसला अन् तिला रूग्णालयात दाखल करावे लागले.

रविवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांनी या तरूणीचा जबाब घेतल्यानंतर तिला सध्या स्नेहालयात दाखल केले आहे. अकोला येथील एका शिक्षिकेने रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, माझ्या 25 वर्षीय मुलीला नगर शहरातील लालटाकी येथील एका तरूणाने त्याच्या साथीदारांसह बोलावून घेत, लग्नासाठी डांबून ठेवले आहे. अशा आशायाची फिर्याद या महिलेने दिली.

याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत रविवारी रात्री तत्काळ त्या तरुण-तरुणीचा शोध घेऊन दोघांनाही लालटाकी परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांंसमोर येताच मुलीने जबाब दिला, मला कुणीही पळवून आणलेले नसून माझे या तरुणावर प्रेम असल्याने मी मर्जीने आले आहे. मुलीचे हे वाक्य ऐकताच तिच्या आईला मोठा धक्का बसला. त्या महिलेला उपचारासाठी तत्काळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com