आई आणि मुलावर बिबट्यांचा हल्ला

खैरीतील शेजुळवस्ती रोड येथील घटना || नागरीक संतप्त
आई आणि मुलावर बिबट्यांचा हल्ला

खैरी निमगांव |वार्ताहर| Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) खैरी निमगांव (Khairi Nimgav) येथील शेजुळ वस्ती (Shejul Vasti) याठिकाणी महिलेला (Woman) मोटारसायकलवरून ओढून दोन बिबट्यांनी हल्ला (Leopard Attack) केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरातील नागरीक भयभीत आणि संतप्त (People Angry) झाले आहेत. गेल्या तिन महिन्यातील ही सहावी घटना असून याबाबत वन विभागाने (Forest Department) ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरीक करत आहेत.

आई आणि मुलावर बिबट्यांचा हल्ला
जेवण लवकर न दिल्याने हॉटेलातील कुकला भट्टीवर ढकलले

उद्धव साबळे हे त्यांच्या पत्नी व मुलासह शेतीची कामे आटोपून घरी जात असताना विश्वनाथ शेजुळ यांच्या शेतातील गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) मोटार सायकलवर मागे बसलेल्या साबळे यांच्या पत्नीला मोटारसायकलवरून ओढले. मोटारसायकलवरील वडील उद्धव साबळे आणी मुलाने गाडी थांबवली. मुलाने आईला वाचवण्याकरीता दगड (Stone) फेकला असता बिबट्या पुन्हा गिन्नी गवतात पळाला. आणी एक जोडीदार घेऊन येत दोन्हीही बिबट्यांनी पुन्हा त्या महिलेवर हल्ला (Leopard Woman Attack) केला. मुलाने आईला वाचवण्याकरीता पुढे होताच बिबट्यांनी त्याच्यावरही हल्ला (Attack) केला. या घटनेने घाबरलेल्या साबळे यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजुळ वस्तीवरील काही तरुणांनी धाडस दाखवून ट्रॅक्टरसह त्यांच्या आवाजाकडे धाव घेतली. ट्रॅक्टरच्या आवाजाने हे बिबटे पळून गेले.

आई आणि मुलावर बिबट्यांचा हल्ला
पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच ठरविले चोर

साबळे यांच्यावर काळ आला पण वेळ नव्हती असा जिवघेणा प्रसंग घडला. त्यानंतर त्यांना रुग्णवाहीकेच्या सहाय्याने उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. या बिबट्याला (Leopard) मानवी रक्त लागल्याने तो नरभक्षक झाला असून त्याचा त्वरीत बंदोबस्त न केल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीक संतप्त (Angry) झाले असून ते आंदोलन (Movement) करण्याच्या भुमिकेत दिसुन येत आहेत. एखादा बळी गेल्यावर वन विभागाला (Forest Department) जाग येणार का? तशी घटना घडली तर त्यास वनविभागच जबाबदार राहील, अशा संतप्त प्रतीक्रीया नागरीक देत आहेत. दरम्यान, शेतीच्या मशागतीची कामे होऊन शेती हिरवी होण्याच्या आतच त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीक करत आहेत.

आई आणि मुलावर बिबट्यांचा हल्ला
निर्यात बंदीने शेतकर्‍यांचे नुकसान

सहावा हल्लाही मोटारसायकल स्वारावरच

बिबट्याने हल्ला करण्याची मागील तिन महीन्यातील अनुक्रमे प्रथम संकेत झुराळे, दुसरी वदक बंधु, तिसरी दुशींग, चौथी डांगे, पाचवी आदीवासी बंधु आणी ही सहावी घटना आहे. या सर्वच घटना पाहता हल्ला मोटार सायकल स्वारांवरच झाला आहे. सुदैवाने शेतात काम करणारे अथवा पायी चालणार्‍या नागरीकांवर त्याने हल्ला केला नसला तरी या घटनेने नागरीक भयभीत झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com