पारनेर, राहुरी, पाथर्डीत सर्वाधिक अशुध्द पाणी

36 गावातील 45 पाणी नमुने दुषित
पारनेर, राहुरी, पाथर्डीत सर्वाधिक अशुध्द पाणी
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साथरोग नियंत्रणासाठी जलस्त्रोत तपासून दूषित पाण्याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जातो. जिल्ह्यात मागील महिन्यांत 1 हजार 731 पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात 36 गावांतील 45 नमुने दूषित आढळले असून तेथे आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या 45 दूषित पाणी नमुन्यांपैकी सर्वाधिक 8 नमुने पारनेर, तर प्रत्येकी 7 दूषित नमुने पाथर्डी, राहुरी तालुक्यात आढळलेले आहेत. त्यानंतर नगर तालुक्यात 6 दूषित नमुने आढळले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर नियमतिपणे पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून महिन्यांत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांतील 1 हजार 731 पाणी नमुने तपासण्यात आले. यातील 45 नमुने दूषित आढळले आहेत. या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रशासनाकडून दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. परंतु ग्रामस्थ खबरदारी घेत नसल्याने दरवर्षी पाणी नमुने दूषित आढळतात.

जलस्त्रोताजवळ उकिरडे, सांडपाणी, शौचालयाचा खड्डा असल्याने स्रोत दूषित झाले आहेत. अशा ठिकाणी ब्लिचिंग पावडरसारखे जलशुद्धीकरण करणार्‍या औषधी वापरण्याच्या सूचना आहेत. तर काही ठिकाणी जलस्त्रोत बंद करण्याच्याही सूचना आहेत.

...................

या गावांत दूषित पाणी

नारायणडोहो, कामरगाव, नागरदेवळे, देहरे, नांदगाव, सजलपूर, खिरविरे, देवठाण, संवत्सर, कोळपेवाडी, हतालखिंडी, वडुले, रायतळे, अस्तगाव, जवळा, सांगवीसूर्या, खांडगाव, खिरडे, आल्हनवाडी, पाडळी, चितळी, जवळे, जिरेवाडी, सूलतानपूर खु., आव्हाने बु., आखेगाव, शेकटे खु., विजापूर,अस्तगाव, शिलेगाव, तांदूळवाडी, अंमळनेर, चांदेगाव, जातक, राजापूर, वडगाव पान अशा 36 गावांत 45 पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

.....................

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com