मोरेचिंचोरे शिवारात गावठी कट्टयातुन हवेत गोळीबार

मोरेचिंचोरे शिवारात गावठी कट्टयातुन हवेत गोळीबार

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे पुणे पोलिसांना वॉरंट मध्ये अटक करण्यासाठी मदत करतो म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी गज मारत रिवाल्वरने हवेत गोळीबार केला असून भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्याच्या डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली.

याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख अशोक माळी (वय 25) रा. मोरेचिंचोरे यांचे फिर्यादीवरून नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट, देविदास उर्फ आबा विक्रम आल्हाट, लखन भाऊसाहेब आल्हाट, सागर बाबुराव इलग सर्व रा. मोरेचिंचोरे यांचे वर सोनई पोलीस ठाण्यात 298/2022 भादवि कलम 307 ,324 506, 427 ,34 आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com