महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 7 मार्च 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला नव्हता. तरी यापुढील प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या लोकशाही दिनास पोलीस, जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी विभागांचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी हजर असतात. तरी संबंधितांनी उपरोक्त नमूद विभागाच्या तक्रारी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात दाखल कराव्यात. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्याबाबत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार्‍या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावा. याबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे. जनतेने याची नोंद घ्यावी, असे आवाहनही निचित यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com