चांदा परीसराला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले; खरिपाचे दिवाळे

चांदा परीसराला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले; खरिपाचे दिवाळे

चांदा | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील चांदा, बऱ्हाणपूर, कौठा परिसराला आज दुपारीच पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून परीसरात रोजच पाऊस सुरू आहे. यापुर्वीही दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक गेली आहेतच. मात्र आजच्या पावसाने पुन्हा एकदा त्यावर पाणी फेरले आणि आता खरिपाची पुर्णतः वाट लागली आहे.

मजुर शेतात पोहताच पावसाला सुरुवात होत असून शेतातील सर्व कामे ठप्प आहेत. पिक पाण्यात आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे.

पंचनामे सुरु झाली असली तरी ते कधी पुर्ण होणार याची शाश्वती नसल्याने शासनाने दिवाळीपुर्वी सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर देऊन बळीराजाची दिवाळी गोड करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com