मान्सूनची शेवटच्या षटकातही चौकार आणि षटकारांची बरसात

मान्सूनची शेवटच्या षटकातही चौकार आणि षटकारांची बरसात

राहाता (तालुका प्रतिनिधी)

यावर्षीच्या मान्सुनला परतीचे वेध लागले आहेत. परंतु पूर्ण हंगामात पावसाने जी धूम चालवली होती तीची झलक मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही दिसणार आहे.

हवामान खात्याने राजस्थान मधून पावसाच्या माघारीला सुरवात झाली असून दि. ५ ते १० ऑक्टोबरच्या दरम्यान तो महाराष्ट्रातून निघून जाईल, असा अंदाज दिला होता. परंतु यावर्षी मान्सूनच्या आगमनापासून तर थेट माघारीच्या तारखांना मान्सूनने चकमा दिला आहे. हवामान बदलामुळे मान्सूनचे होत असलेल्या अनियमित वर्तनाचा हा संक्रमण काळ पुर्वापार घटकांच्या अभ्यासाच्या मर्यादा दर्शवित आहे. सध्या मान्सूनची परतीची वाटचाल चालू आहे.

परंतु परत जाताना सुध्दा अनेक भागात ढगफुटी होऊन पूरस्थिती निर्माण होईल. खरीप पिकांच्या काढणीची वेळ असल्याने यावेळचा पाऊस जादा नुकसानकारक असेल. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात याभागात विस्तारीत होणार असल्याने ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ठिकठिकाणी पाऊस पडेल.

विशेषतः ७ आक्टोबर पासून विदर्भात सुरू झालेला पाऊस ९ तारखेपर्यंत नगर नाशिकपर्यंत पोहचेल अशी स्थिती आहे. या भागात ९ ते १२ तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण जादा असेल. यानंतर दोन तीन दिवसात पाऊस हळूहळू कमी होत जाईल. परंतु दी १६ ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्र कनाटक किनारपट्टी समोरील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस होईल अशी चिन्हे आहेत. असे हवामान उभ्यासक व जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी सांगितले.

या परिस्थितीत शेतमाल काढणे आणि तो भिजण्यापासून सुरक्षित ठेवणे याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ऑक्टोबर मधील पावसामुळे रब्बीच्या मशागतीला काही भागात विशेषतः काळ्या व खोल जमीनीत उशीर होईल. एकंदरीत यावर्षी पावसाच्या बदलाचा परिणाम जास्त तिव्रतेने जाणवला आहे. अर्थात यापुढच्या संक्रमण काळात यात वाढ होत राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com