पैशावरून दोन कुटुंबात हाणामारी

नागापूरची घटना || परस्परविरोधी गुन्हे
पैशावरून दोन कुटुंबात हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उसणे पैशाच्या (Money) देवाण-घेवाणीवरून नागापूर (Nagapur) परिसरातील आदर्शनगरमध्ये दोन कुटुंबात (Family) लाकडी दांडक्याने हाणामारी (Beating) झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल (Crimes Filed) करण्यात आले आहेत.

पैशावरून दोन कुटुंबात हाणामारी
गडकरींना तनपुरेंनी दिले भोजनाचे आमंत्रण!

रोहन उत्तम कोतकर (वय 24) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्वजित सिंग, कुसुम सिंग, विश्वजित सिंगचे वडिल (पूर्ण नाव माहिती नाही) व एक अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल (Crimes Filed) केला आहे. ऊसने पैशाचे कारणावरून चौघांनी घरात घुसून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. कुसुम सिंगने लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पैशावरून दोन कुटुंबात हाणामारी
तुळजापूरच्या भवानीची पालखी राहुरीतून तुळजापूरला रवाना

विश्वजित राजेश कुमारसिंग (वय 24) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहन उत्तम कोतकर विरोधात गुन्हा दाखल (Crimes Filed) करण्यात आला आहे. ऊसणे दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने रोहन कोतकरने शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक सुनील आव्हाड करीत आहेत.

पैशावरून दोन कुटुंबात हाणामारी
खड्ड्यात डांबर दाखवा 10000 रुपये मिळवा!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com