
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
व्यावसायिकाच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी कारमधील एक लाख 42 हजार 500 रूपयांची रक्कम, विविध बँकेचे चेकबुक असा ऐवज असलेली बॅग चोरून नेली आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील मार्केट यार्ड चौकातील चंदन अॅटोमोबाईलसमोर मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय यशवंत वाघ (वय 52 रा. गजानननगर, नेप्ती रोड, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शिरूर (पुणे) येथे शोरूम आहे. ते सचिन मुनोत यांच्या सिध्देश मोटर्समधून दुचाकी खरेदी करून शिरूर येथे त्यांच्या शोरूममधून विक्री करत असतात. त्यापोटी फिर्यादी यांनी मुनोत यांना डिपॉझिट म्हणून दोन लाख रूपये देण्याचे ठरले होते. पैकी एक लाख आधी दिले होते. एक लाख देण्यासाठी फिर्यादी रक्कम घेऊन आले होते.
त्यांनी ती रक्कम त्यांच्या कारमधील पाठीमागच्या सीटवर ठेवली होती. चोरट्याने कारची काच फोडून बॅग चोरून नेली. अधिक तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.