संगमनेरात 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड घेवून चोर पळत होते पुढे झाले असे काही...

संगमनेरात 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड घेवून चोर पळत होते पुढे झाले असे काही...

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

मोटारसायकलच्या (Motorcycle) डिक्कीतून सात लाख रूपयांची रोकड (Money) चोरून पळून जाण्याच्या तयारीत असतांना दोघांचा नागरिकांनी पाठलाग करुन संगमनेर (Sangamner) शहर पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून या दोघांकडून 6 लाख 70 हजार रूपये पोलिसांनी हस्तगत केले आहे. तर तिसरा आरोपी (Accused) 30 हजार रूपये घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.ही घटना बुधवार (ता.7) जून रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान शहरातील मार्केटयार्ड जवळ घडली.

संगमनेरात 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड घेवून चोर पळत होते पुढे झाले असे काही...
आ.थोरात दक्षिणेत आल्यास लढत रंजक होऊ शकते, काय म्हणाले खा. विखे...

याबाबत संगमनेर (Sangamner) शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांडुरंग यशवंत शेटे हे शहरातील मालदाड रोड सुकेवाडी येथील राहणार आहेत ते आपल्या दुचाकीच्या डिक्कीतून सात लाख रूपयांची रोकड काढत होते. दरम्यान अत्रुकुमार अबदेश यादव, अमनकुमार जगनमोहन यादव दोघेही राहणार नयाटोला जोराबगंज ता. कोढा जि. कटीहार (बिहार) व त्यांचा आणखीन एक साथीदार नाव माहीत हे तिघेजण त्याठिकाणी गेले. आणि थेटे यांच्याकडून रक्कम बळजबरीने ओढून घेवून दुचाकीवरुन पळून जात होते. मात्र थेटे यांनी आरडा- ओरड केल्याने नागरिकांसह पोलिसांनी (Police) पाठलाग करुन त्यांना पकडले असून त्यांच्याकडून 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड हस्तगत केली आहे.

संगमनेरात 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड घेवून चोर पळत होते पुढे झाले असे काही...
नगर, संगमनेरच्या घटनांवरून पवार-फडणवीस यांच्यात जुंपली!

त्यांच्या तिसर्‍या साथीदाराने 30 हजार रूपयांची रक्कम चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी पांडुरंग शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 462/ 2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस साह्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहे. दरम्यान या आरोपींकडून यापूर्वी संगमनेरात अजून किती ठिकाणी चोर्‍या केल्या आहे. याची उकल होणे गरजे असून त्या पद्धतीने संगमनेर पोलीस (Sangamner Police) निरीक्षक भगवान मथुरे तपास करत आहे.

संगमनेरात 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड घेवून चोर पळत होते पुढे झाले असे काही...
समनापूरच्या घटनेची चौकशी करण्याचे ना. विखेंचे आदेश
संगमनेरात 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड घेवून चोर पळत होते पुढे झाले असे काही...
समनापूर दगडफेक प्रकरणी 17 जणांना अटक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com