सव्वा तीन लाखांची रक्कम पळविणारा अटकेत

रक्कम हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सव्वा तीन लाखांची रक्कम पळविणारा अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar'

तारकपूर येथील रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख 30 हजार रुपयांची रक्कम पळविणारा परप्रांतीय आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. रमेश रामू कोळी (वय 32 रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्र प्रदेश, हल्ली रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख 15 हजार रुपयांची रोकड तसेच एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती) यांनी त्यांचे मित्र सुनील कांडेकर यांच्या ऑपरेशनकरिता बँकेतून काढलेले तीन लाख 30 हजार रुपये तारकपूर येथील सिटी केअर रूग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीमध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्याने डिक्कीचे लॉक तोडून रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पथकाची नेमणूक करून तपासाबाबत सूचना दिल्या. संशयित दोन व्यक्ती दुचाकीसह नेवासा रोडने औरंगाबादकडे पळून जात असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, जालिंदर माने, योगेश सातपुते व बबन बेरड यांनी पाठलाग करून त्यातील एकाला बॅगसह शिताफीने ताब्यात घेतले. तर अशोक राम गाजवार (रा. विजयवाडा, रेल्वे स्टेशन जवळ, आंध्र प्रदेश हल्ली रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) हा पळून गेला आहे.

Related Stories

No stories found.