
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
कोंड्यामामा चौक, मंगलगेट येथील शिवशक्ती ट्रेडिंग या दुकानाच्या गल्ल्यातून अनोळखी व्यक्तीने दोन लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. शनिवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी दुकान मालक दिपक टेकचंद आहुजा (वय 52, रा. मकासरे हेल्थ क्लबसमोर, सिव्हील हाडको) यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आहुजा यांचे कोंड्यामामा चौकात शिवशक्ती ट्रेडिंग नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजता ते दुकानात एकटे असताना दुकानात देवाची पूजा करत होतो. त्यावेळी दुकानाच्या दरवाजाजवळील काऊंटरमधील गल्यात एका अनोळखी व्यक्तीने हात घालून दोन लाख रुपयांची रोख रक्कम, डायर्या व बीलबुक चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरी केल्यानंतर सादर व्यक्ती एका पांढर्या रंगाच्या मोपेड मोटार सायकलवरील व्यक्तीच्या मागे बसून दाळमंडईकडे जाणार्या रोडने निघून गेला. अधिक तपास पोलिस करत आहेत.