पिकअपमधून एक लाखाची रक्कम लांबविली

खोसपुरी शिवारातील घटना || पोलिसांत गुन्हा
पिकअपमधून एक लाखाची रक्कम लांबविली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून बाथरूमसाठी जाणे एकाला चांगलेच महागात पडले. गाडीमध्ये ठेवलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. नगर-औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात लेमन टी हॉटेलच्या पुढे रविवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी स्वप्नील अंबादास पवार (वय 27 रा. बालसा वडाळा, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी रविवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पवार हे रविवारी त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन नगर-औरंगाबाद रोडने प्रवास करत होते. ते खोसपुरी शिवारात आले असता हॉटेल लेमन टीच्या पुढे स्पीडबे्रकरजवळ त्यांनी पिकअप थांबविली.

ते बाथरूमसाठी गेले असता चोरट्याने पिकअपमधील ब्लँकेटमध्ये ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. फिर्यादी पिकअप जवळ आल्यानंतर रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आर.व्ही.थोरवे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com