सोमवारपासून अँटीबॉडीज तपासणी अभियान

आठ विविध संस्था एकत्र येऊन राबविणार उपक्रम
सोमवारपासून अँटीबॉडीज तपासणी अभियान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण वाढत असले तरी हर्ड इम्युनिटीही तयार होत आहे. अनेकांमध्ये करोनाच्या अँटीबॉडीजही तयार झालेल्या असू शकतात. यादृष्टीने नगर शहरात 8 विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत नागरिकांसाठी अँटीबॉडी तपासणी अभियान आयोजित केले आहे.

सोमवार (दि.17) पासून इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात ही अँटीबॉडी तपासणी सुविधा सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत उपलब्ध असेल. या तपासणीसाठी प्रति व्यक्ती 300 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. थायरोकेअरची टीम ही तपासणी करणार आहे. सकल राजस्थानी युवा मंच, बडीसाजन ओसवाल युवक संघ, नगर होलसेल जॉगरी असोसिएशन, जय आनंद महावीर युवक मंडळ, सी.ए.असोसिएशन नगर, जिनगर बॉईज, वर्धमान युवा संघ, माहेश्वरी युवा संघठन, महावीर प्रतिष्ठान या संघटनांनी एकत्र येत नगरकरांसाठी हे अभियान हाती घेतले आहे. या टेस्टमध्ये शरिरात अँटीबॉडी आढळून आल्या तर तुम्हाला करोना होऊन गेला आहे हे लक्षात येईल.

तसेच पुढचे किमान 3 महिने नव्याने करोनाची बाधा होणार नाही याची शाश्वती मिळते. ज्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडी टेस्टचा रिझल्ट 15 च्या पुढे असेल त्या व्यक्ती प्लाझ्मा दानही करू शकतील. ज्यांची अँटीबॅडी टेस्ट निगेटिव्ह येईल त्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे, म्हणजे त्यांच्यातही अँटीबॉडी निर्माण होण्यास मदत होईल, या अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी अँटीबॅाडी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com