
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दारू पिऊन घरात घुसून शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला. तसेच दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना कल्याण रोड येथे घडली. याप्रकरणी अक्षय सुर्यवंशी, जगदीश मदने, कार्तिक भडकवाड (तिघे रा. कल्याण रोड) यांच्याविरूध्द पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने फिर्यादीत म्हटले, 20 तारखेला रात्री साडेआठ वाजता पीडीत महिला व तिचा मानलेला भाऊ व त्यांचा मुलगा हे घरात असताना अक्षय सुर्यवंशी हा कारण नसताना दारू पिऊन घरात शिरला. त्याच्या हातात लाकडी दांडके होते. त्याने शिवीगाळ केली. त्यास शिवीगाळ का करतो असे विचारले असता, त्याने मिठीत ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घराबाहेेर पीडीतेचा मानलेला भाऊ व त्यांचा मुलगा यांना सुर्यवंशी, मदने, भडकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.