
अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
घरात घुसून महिलांना मारहाण (Woman Beating) करत त्यांचा विनयभंग (Molestation) केला. तसेच घरातील एका पुरूषाचे अपहरण (Abduction of a Man) केल्याची घटना नगर तालुक्यातील (Nagar Taluka) एका गावात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी विनयभंग (Molestation) झालेल्या पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द अपहरण (Abduction), मारहाण (Beating), विनयभंग (Molestation) आदी कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.
प्रमोद एकनाथ गोरे, विनोद एकनाथ गोरे, प्रमोदचा मेव्हणा सचिन अनभुले व त्यांच्या सोबत दोन अनोळखी विरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रमोद, विनोद, सचिन व दोन अनोळखी फिर्यादीच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या जावासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
फिर्यादीची सासुला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केले. तलवारीने तुकडे करून टाकु, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीला संमतीशिवाय बळजबरीने अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी घेऊन गेले असल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.